‘ATM’ चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळ्यांच्या मागावर ‘SIT’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड पोलिसांच्या पुढे ‘एटीएम’ चोरीचे प्रकार रोखण्याचे मोठे आवाहन निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी आज एटीएम सेंटर असणाऱ्या सर्व बँक अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन सूचना दिल्या आहेत. तर सुरक्षा न पुरविल्यास १८८ प्रमाणे कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तपासासाठी ‘एसआयटी’ची स्थापना केली असून यामध्ये तीन टोळ्यांचा समावेश असण्याचे समोर येत आहे. त्यातील काही आंतरराष्ट्रीय टोळ्या असून त्यांच्या मागावर असल्याचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सोमवारी सांगितले.

रविवारी पहाटे म्हाळुंगे, चाकणच्या हद्दीत खराबवाडी येथील अक्सिक्स बँकेचे एटीएम दोरीच्या सहाय्याने ओढून चोरट्यानी साडे नऊ लाख रक्कम लंपास केली. यापूर्वीही एटीएम चोरीच्या घटना घडलेल्या असून गुन्हेगार मोकाट आहेत. आळेफाटा येथील एटीएम चोरी प्रकरणात टोळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीला ताब्यात घेऊन चौकशी केली जाणार आहे. तसेच लोकल गुन्हेगारांचा समावेश आहे का याचाही तपास सुरु आहे.

एटीएम चोरी रोखण्यासाठी आणि घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी ‘विशेष तपास पथका’ची नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे हे प्रमुख असून चार अधिकारी आणि बारा कर्मचारी यांचा समावेश आहे. याची देखरेख गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त करणार असून एटीएम चोरीचे गुन्हे उघडकीस येई प्रयत्न हे पथक एवढेच काम करणार आहे. याची दररोज माहिती घेतली जाणार आहे.
तपासात आंतरराष्ट्रीय आणि आंतरराजीय तीन टोळ्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने एसआयटी तपास करत आहे.

एटीएम सेंटरच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे, आलार्म सिस्टीम, सशस्त्र सिक्युरिटी, पुरेसा उजेड या सारख्या अनेक उपाय योजना सुचवलेल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/