सिदंगीचे आमदार एम. सी. एस मनागुली यांचे निधन

बंगलुरु: विजयपुरा सिदंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जेडीयुचे ज्येष्ठ नेते एम सी एस मनागुली (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने पहाटे निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून बंगलुरु येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. उपचार सुरु असतानाच पहाटे यांची प्राणज्योत मालवली.

मनागुली मल्लप्पा चन्नवीरप्पा यांच्या मागे पत्नी, तीन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. वृद्धापकाळामुळे त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने ९ जानेवारी रोजी त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल केले होते. मनागुली यांचा २९सप्टेंबर १९३६ रोजी बागेवाडी तालुक्यातील मनोली येथे झाला होता. त्यांनी सिदंगी मतदारसंघातून ७ वेळा निवडणुक लढविली होती. ते दोन वेळा आमदार झाले. २०१८ मधील विधानसभा निवडणुकीत वर्षाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करुन विधानसभा गाठली होती. त्यांनी जे एच पटेल यांच्या सरकारमध्ये पंचायत राज्यमंत्री म्हणून काम केले होते. तसेच जेडीएस – काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये कृषि मंत्री म्हणून काम केले होते. विजापूर जिल्ह्याचे प्रभारी मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.