Siddarth Jadhav | सिद्धार्थ जाधवच्या येण्याने घरात निर्माण होणार टेन्शनचे वातावरण; कारण सिद्धार्थ जाताना…..

पोलीसनामा ऑनलाइन : Siddarth Jadhav | टेलिव्हिजनवर चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) . सध्या बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू आहे. यामध्ये अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. नुकतीच या घरातून तेजस्विनी एक्झिट झाली आहे. तिच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे तिला घराबाहेर पडावे लागले. तिच्या जाण्याने मात्र प्रेक्षक नाखूश असल्याचे दिसत आहेत, तर सोशल मीडियावर तेजू ला परत आणा असे एक ना अनेक मेसेज येत आहेत, तर आता त्यातच घरात पुन्हा एकदा एक पाहुणा हजेरी लावणार आहे. याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Siddarth Jadhav)

बिग बॉसच्या घरात अनेक सेलिब्रेटी नेहमीच हजेरी लावत असतात आणि ते घरातील स्पर्धकांना टास्कही देत असतात. आता बिग बॉसच्या घरात पाहुणा म्हणून मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव हजेरी लावणार आहे. कलर्स मराठीने अधिकृत इंस्टाग्रामवर याचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली आहे. सिद्धार्थ घरात येताच त्याला पाहून स्पर्धक खूश होतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, मात्र सिद्धार्थने घरात येताच एक अशी गोष्ट सांगितली ज्याने स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील तो आनंद क्षणातच गायब झालेला दिसला. (Siddarth Jadhav)

सिद्धार्थच्या येण्याने घरात आनंदाचे वातावरण तयार झाले होते. मात्र, त्याने घरात एन्ट्री घेतल्यानंतर सांगितले की,
मी जेव्हा या घरातून एक्झिट होईन तेव्हा माझ्यासोबत मी एका स्पर्धकाला घेऊन जाणार आहे.
त्याच्या बोलण्याने सध्या स्पर्धक घाबरलेले दिसत आहेत, तर या व्हिडिओवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत.
एक नेटकरी कमेंट करत म्हणत आहे की, “घाबरू नका हा कुठल्यातरी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला आहे,”
तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले आहे “कोणीही जाऊ दे आपली तेजू मस्त होती तिला परत घेऊन या”
अशा एक ना अनेक कमेंट या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत.

Web Title :- Siddarth Jadhav | actor siddharth jadhav entry into bigg boss marathi 4 house

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jubin Nautiyal | प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल रुग्णालयात दाखल; डोक्याला झाली गंभीर दुखापत

Pune Pimpri Crime | प्रेमात खर्चलेल्या पैशांची मागणी करत तरुणीवर बलात्कार; भोसरी परिसरातील घटना

Udayanraje Bhosale | उदयनराजे भाजप सोडणार? उद्या निर्णय घेणार