अ‍ॅक्टरवरून ‘सिंगर’ झाला बॉलिवूडचा ‘MC Sher’, रिलीज केलं पहिलं गाणं ‘धूप’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सिद्धांत चतुर्वेदी यानं गली बॉय या सिनेमात एमसी शेर ही भूमिका साकारली होती. त्याच्या अ‍ॅक्टींगची खूप चर्चा झाली. साईड रोल का असेना पण त्याचा रोल खूप चर्चेत राहिला. सिनेमात सिद्धांतनं एका रॅपरचा रोल साकारला होता. अस वाटत आहे की, रॅपरच्या रोलनं खूप इंस्पायर झाला आहे म्हणूनच अनलॉक 1 मध्ये त्यानं त्याचं पहिलं गाणं रिली केलं आहे.

सिद्धांत चतुर्वेदीनं त्याचं पहिलं गाणं रिलीज केलं आहे. धूप असं त्याच्या गाण्याचं नाव आहे. गेल्या आठवड्यापासूनच तो धूप गाण्याशी संबंधित माहिती सोशलवर शेअर करत होता. आता त्यानं सोशलवरून त्याचं हे गाणं शेअर केलं आहे आणि चाहत्यांना खूप सारं प्रेम देण्याचं अपील केलं आहे.

गाणं शेअर करताना सिद्धार्थनं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये सिद्धांत म्हणतो, “धूप रिलीज झालं आहे. तुमचा हेडफोन आणि सनग्लासेस जवळ ठेवा आणि धूप ऐका.”

सिद्धांत चतुर्वेदीनं डीएडब्ल्यू गीकसोबत मिळून हे गाणं कंपोज केलं आहे. सिद्धांतनं घरीच या गाण्याची शुटींग केली आहे. यासाठी त्याच्या कुटुंबानंही त्याची मदत केली आहे.