पोलीसनामा ऑनलाइन टीम – Siddhanth Shakti Kapoor Detained | ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) बॉलीवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला क्लीन चिट मिळाली आहे. हे प्रकरण अद्यापही सुरूच असताना आता आणखी एका अभिनेत्याच्या मुलाला रेव्ह पार्टीत (Rave Party) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंगळुरूत एका हॉटेलमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती (Rave Party In Bangalore Hotels) . त्यावेळी, पोलिसांनी ही कारवाई केली. त्यावेळी ज्येष्ठ अभिनेता शक्ती कपूरचा (Shakti Kapoor) मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाऊ सिद्धांत कपूरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एएनआयनुसार बंगळुरूच्या एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सिद्धांत कपूर तेथे आढळून आला (Siddhanth Shakti Kapoor Detained). त्याला ताब्यात घेतल्यानंतर चाचणीमध्ये सिद्धांत कपूरसह सहा जणांनी ड्रग्जचे सेवन केल्याचे समोर आले आहे.
Karnataka | Actor Shraddha Kapoor's brother Siddhanth Kapoor detained during police raid at a rave party in a Bengaluru hotel, last night. He is among the 6 people allegedly found to have consumed drugs: Bengaluru Police pic.twitter.com/UuHZKMzUH0
— ANI (@ANI) June 13, 2022
ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांचा सिद्धांत हा मुलगा असून तो स्वत:ही फिल्म लाईनमध्ये आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.
पण त्याची कारकीर्द फ्लॉप ठरली आहे. याशिवाय वेब सिरीज, म्युझिक व्हिडीओमध्येही दिसला आहे.
हसीना पारकर या चित्रपटात सिद्धांतने श्रद्धासोबत काम केले होते. दरम्यान, सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात NCB च्या रडारवर आलेली श्रद्धा कपूरचीही एनसीबीच्या पथकाने चौकशी केली होती.
Web Title :- Siddhanth Shakti Kapoor Detained | actor shraddha kapoors brother and shakti kapoors son siddhanth kapoor detained during police raid at a rave party in bangalore mg road hotel
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update