Siddharth Chandekar | ‘तुला परवानगी देणारा मी कुणीच नाही’ ! ‘तिच्यासाठी’ची सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट प्रचंड व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मराठी मालिका आणि सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) याने आपल्या इंस्टाग्राम (Instagram) वरून एक पोस्ट शेअर केली आहे. घरातील काम, कुटुंबीयांच्या गरजा, मुलांबाळांची कामं, ऑफिसमधील दगदग या रोजच्या धावपळीत ‘ती’ स्वत:साठी वेळ काढायला विसरूनच जाते. तू स्वत:साठी वेळ काढ, असं कोणीतरी तिला केवळं म्हटलं तरी ते पुरेसं होतं. अशा प्रत्येकीसाठी सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) याने हि पोस्ट लिहिली आहे. सिद्धार्थ चांदेकरच्या या पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने आपल्या पोस्टला ‘तिच्यासाठी’ असं शीर्षक दिले आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये ‘कशी आहेस? दमली आहेस ना? एक काम कर, जरा वेळ बस. हा चहा घे. केवढी दगदग करतेस? घरातलं पण बघा, व्यवसाय पण बघा, पोरं बाळं पण सांभाळा, तुम्हालाच जमू शकतं हे. आमच्यात नाही बाबा एवढी ताकद. पण आता जरा थांब. मस्त फिरून ये. मोकळी होऊन ये. नव्या मैत्रीणी कर,मज्जा कर. तुला परवानगी देणार मी कोणीच नाही, तूच स्वतःला परवानगी दे. डोकं इथेच ठेव आणि त्या मनाला जग दाखवून ये. मी सांभाळतो तोपर्यंत इथलं. पण ये काय, तुझ्याशिवाय पान हलत नाही आमचं.’ या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सिद्धार्थने लिहिलं, ‘तू हसलीस की घरात रंग येतात. तू मज्जा करत असलीस की जग सुंदर दिसतं. जा, फिरून ये, जग बघून ये. मी आहेच.’ असे लिहिले आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याच्या लिखाणाचं आणि विचारांचं कौतुक केलं आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) याच्या वर्कफ्रन्टबद्दल बोलायचे झाले तर त्याचा झिम्मा चित्रपट (Jhimma Movie) हा बिग बजेट आणि तगडी स्टारकास्ट असणारा चित्रपट 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. वेगवेगळ्या वयोगटातील, वेगळ्या संस्कृतीमध्ये वाढलेल्या 7 महिला त्याच्या कामातून वेळ काडून पहिल्यांदाच घराबाहेर पडतात आणि एका टुरिंग कंपनीसोबत ब्रिटनला ट्रीपला जातात. त्यानंतर त्यांच्यासोबत काय घडतं, त्या कशी धमाल मस्ती करतात, या ट्रीप त्यांच्या आयुष्यात काय वळण येतं, हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar), निर्मिती सावंत (Nirmiti Sawant), मृण्मयी गोडबोले (Mrinmayi Godbole), सायली संजीव (Sayali Sanjeev), क्षिती जोग (Kshitee Jog), सुहास जोशी (Suhas Joshi) हे प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहे. तर हेमंत ढोमे (Hemant Dhome) याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

 

Web Title :- Siddharth Chandekar | Actor siddharth chandekar special post for women getting applause from netizens-post goes viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Rains | राज्यात आगामी 4 दिवस पाऊस ‘कोसळणार’ – IMD

Nawab Malik | बनावट नोटांवरून नवाब मलिकांचा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर नवीन आरोप, म्हणाले…

Gujarat ATS | गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त, ATS कडून 120 कोटींचा माल ताब्यात

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राची भेट ! 18 महिन्यांपासून रखडलेल्या DA थकबाकीबाबत मोठं अपडेट आलं समोर

Sapna Chaudhary | अभिनेत्री सपना चौधरी विरुद्ध अटक वाॅरंट; ‘या’ प्रकरणात गुंतलीय देशी क्वीन

Pune Corporation | एक कोटी रुपयांची बोगस बिले ! फौजदारी आणि प्रशासकीय चौकशी देखील करणार;
अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांचे सर्वसाधारण सभेत आश्वासन