Siddharth Chandekar | झिम्मा चित्रपटाला उजाळा देत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनी केली पोस्ट; पोस्ट चर्चेत

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सध्या दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) याचा ‘सनी’ (Sunny) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तर गेल्यावर्षी त्याने दिग्दर्शित केलेला ‘झिम्मा’ (Jhimma) हा चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगलीच कमाई केली होती. याच आठवणींना अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) यांनी उजाळा दिला आहे. सिद्धार्थ चांदेकर हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. त्याचे पोस्ट आणि व्हिडिओज सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच वायरल होत असतात नुकताच त्याने शेअर केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. (Siddharth Chandekar)

 

नुकताच ‘झिम्मा’ (Jhimma) या चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक वर्ष पूर्ण झाल्याने सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी झिम्मा या चित्रपटाचा एक पोस्टर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये म्हटले,”मागच्या वर्षी तुम्ही बायकांनी काहीतरी अविस्मरणीय करुन दाखवलं. त्याला एक वर्ष पूर्ण झालंय. खूप प्रेम. आणि खूप आभार. amazon prime video वर तुमचा दंगा चालू राहुद्या”. या चित्रपटात सिद्धार्थने टूर गाईडची भूमिका साकारली होती. बायकांच्या ग्रुपला लंडन फिरवून दाखवणाऱ्या सिद्धार्थच्या भूमिकेचं बऱ्याच लोकांनी कौतुक केले होते आणि या वेळच्या शूटिंगचे किस्से देखील सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले होते.

लॉकडाऊन नंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.
या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) बरोबर सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni),
निर्मिती सावंत (Nirmiti Sawant), मृण्मयी गोडबोले (Mrinmayee Godbole), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar),
सायली संजीव (Sayali Sanjeev), सुहास जोशी (Suhas Joshi), क्षिती जोग (Kshitee Jog)
यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर झिम्मा हा चित्रपट आता ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

 

Web Title :- Siddharth Chandekar | siddharth chandekar post on 1 year completed of jhimma

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitin Gadkari | राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Govinda Naam Mera | अखेर ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमध्ये सयाजी शिंदे यांची झलक

Pune Pimpri Crime | पैसे दुप्पट करुन देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरीकाला घातला 33 लाखांचा गंडा, बावधन मधील घटना