Siddharth Chandekar | अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं ‘माझे स्वेटशर्ट्स चोरू नकोस’ अशी वॉर्निंग देत केली पोस्ट शेअर

पोलीसनामा ऑनलाईन : आजकाल सोशल मीडियावर अनेक अभिनेते मोठ्या प्रमाणात झळकताना आपल्याला दिसतात. त्यांचा काही पोस्ट इतक्या व्हायरल होतात की चाहत्यांना जणू काही वेडच लावून ठेवतं. अशाच पद्धतीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हि पोस्ट मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) याची आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) हे दोघेही नेहमी सोशल मीडियावर एकमेकांवर त्यांचे प्रेम व्यक्त करताना दिसतात आणि त्यांचे पोस्ट हे नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. तसेच सिद्धार्थची (Siddharth Chandekar) क्रिएटिव पोस्ट चाहतांचे लक्षच वेधून घेत असते. अशाच पद्धतीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे ज्यामध्ये त्याने चक्क ‘माझे स्वेटशर्ट्स चोरू नकोस’ असा उल्लेख केला आहे.

सिद्धार्थने (Siddharth Chandekar) इंस्टाग्राम वर ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थने असे लिहिले आहे की, “Happy Birthday ताई. अशीच रहा माझ्या पाठीशी. मग बघ मी काय जादू करतो ते. मला तुझा खूप अभिमान आहे. मी जे काही आणि जो काही आहे, त्यात जितकी आई आहे तितकीच तू पण आहेस. पण म्हणून माझे Sweatshirts चोरू नकोस. आय लव यू.”

यावरून एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात येते की सिद्धार्थ (Siddharth Chandekar) हा त्याच्या बहिणीलाही
आईप्रमाणेच महत्त्व देतो आणि वेळोवेळी त्याने ही कबुली दिली आहे.
या पोस्टवर त्याच्या बहिणीने देखील अगदी मजेशीर असे रिप्लाय करत ‘तुझे स्वेटशर्ट्स माझेच आहेत’ असा उल्लेख केला आहे.

Web Title :-  Siddharth Chandekar | siddharth chandekar shares post sister birthday says dont steal my sweatshirts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, सुप्रीम कोर्टाने दिले ‘हे’ निर्देश

Pune Fire News | लुल्लानगरमधील सातव्या मजल्यावरील हॉटेलला भीषण आग

Pune Traffic News | धायरी भागात जड वाहनांना बंदी