Siddharth Jadhav | सिद्धार्थ जाधवने आई-वडिलांचे ‘ते’ स्वप्न केले पूर्ण; पोस्ट शेअर करत दिली माहिती

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता अशी ओळख सिद्धार्थ जाधवने (Siddharth Jadhav) कमावली. सिद्धार्थ जाधवने त्याच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक विनोदी भूमिका साकारल्या त्यामुळे विनोदी अभिनेता म्हणून तो घराघरात जाऊन पोहचला. त्यानंतर त्याने वेगळ्या अंदाजातील पात्रही साकारले. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांतूनही काम केले. शून्यातून सुरूवात करत सिद्धार्थ (Siddharth Jadhav) आज मराठी चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार झाला आहे.

 

सिद्धार्थ जाधवने मराठीपाठोपाठ हिंदी चित्रपटांमध्येही काम करण्यास सुरुवात केली. गोलमाल रिटर्न, सिम्बा, सर्कस, थ्री चिअर्स अश्या बऱ्याच हिंदी चित्रपटात त्याने काम केलंय. तसेच नुकतेच त्याचा बालभारती, तमाशा लाईव्ह, दे धक्का- 2 हे सिनेमे चांगलेच गाजले. असा हा आपला हरहुन्नरी कलाकार सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो.

 

नुकतंच सिद्धार्थ जाधवने त्याचं एक मोठ स्वप्न पूर्ण केलं आहे.
सिद्धार्थने त्याच्या सोशल अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
त्याने त्याच्या घराबाहेरील नावाच्या पाटीचा फोटो शेअर केला आहे. सिद्धार्थच्या (Siddharth Jadhav)
या पोस्टचं कॅप्शनही तितकेच लक्षवेधी आहे. “स्वप्नपूर्ती…. #आईबाबा “असं कॅप्शन त्याने लिहिलं आहे.
सिद्धार्थने त्याच्या आई-वडिलांना घर घेऊन दिलं आहे आणि घराबाहेरील पाटीवर त्याची आई मंदाकिनी रामचंद्र जाधव आणि वडील रामचंद्र भागोजी जाधव अशी दोघांची नाव लिहिली आहेत. हा फोटो शेअर करत त्याने आई वडिलांसाठी नवीन घर घेतल्याची माहिती दिली आहे. पुढे या पोस्टमध्ये त्याने माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण. आज माझं स्वप्न सत्यात उतरलं असही म्हंटल आहे.

 

Web Title :- Siddharth Jadhav | marathi actor siddharth jadhav buy new home for mother father share instagram post

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aurangabad Crime News | सुसाईड नोट लिहून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; औरंगाबादमधील घटना

Raigad District Bank Fire | रायगड जिल्हा बँकेला भीषण आग; कागदपत्रे एका क्षणात जळून खाक

Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास