Siddharth Malhotra And Kiara Advani Marriage | सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या लग्नाबाबत त्यांच्या मित्राने केला ‘हा’ मोठा खुलासा; म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra And Kiara Advani Marriage) हे लवकरच लग्नाच्या बेडीमध्ये अडकणार आहेत. जानेवारी २०२३ मध्ये कियारा व सिद्धार्थ (Siddharth Malhotra And Kiara Advani Marriage) आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. या दरम्यान सिद्धार्थ व कियाराच्या लग्नाबाबत त्यांच्या एका मित्राने मोठा खुलासा केला आहे.

 

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही आहे. “मला सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाबाबत कोणतीही माहिती नाही. मला किंवा कोणलाही अद्याप त्यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका मिळालेली नाही आहे. त्यांचं लग्न होत नाही आहे. हा कोणाच्या तरी स्वप्नातला लग्नसोहळा आहे”, असा खुलासा सिद्धार्थ-कियाराच्या एका जवळच्या मित्राने केला आहे.

 

तसेच तो पुढे म्हणाला, “सिद्धार्थ व कियारा एवढ्यात लग्न करणार नाही आहेत.
जर हे सिक्रेट वेडिंग असेल, तर कदाचित ते फक्त त्या दोघांनाच माहीत असेल.
पण जर हे सिक्रेट वेडिंग आहे, तर माध्यमांना याबाबत माहिती कशी मिळाली? माध्यमांनी त्यांच्या लग्नाची गेस्ट लिस्टही तयार केली आहे.
सिद्धार्थ व कियाराच्या जवळच्या व्यक्ती सगळ्यांना ठाऊक आहेत.
त्यामुळे या लिस्टमध्ये करण जोहरचं नाव येणं साहजिकच आहे”.असे तो म्हणाला.
कियारा व सिद्धार्थने ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केले होते तेव्हापासून त्यांच्या डेटिंग व लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

 

Web Title :- Siddharth Malhotra And Kiara Advani Marriage | siddharth malhotra kiara advanis friend on their wedding news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aaditya Thackeray | ‘समृद्धी महामार्गाला नाव बाळासाहेबांचं, पण नातवालाच…’; आदित्य ठाकरेंनी व्यक्त मनातली खंत

Subramanian Swamy | सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदींची केली रावणाबरोबर तुलना

Shriya Saran | श्रिया सरनच्या ‘या’ वक्त्यव्यामुळे ती चर्चेत; ‘या’ महिला अभिनेत्रीवर क्रश असल्याचे सांगितले