अभिनेत्री तारा सुतारिया की कियारा आडवाणी, नक्‍की कोणासोबत सिध्दार्थचं ‘झेंगाट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सिद्धार्थ मल्होत्राचा ‘जबरिया जोड़ी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. अलीकडेच सिद्धार्थ आपल्या अफेयर मुळे चर्चेत होते. सिद्धार्थ सोबत कियारा आडवाणीचे नाव जोडले गेले होते. याच्या व्यतिरिक्त तारा सुतारिया सोबत ही अफेयरचे अफवा उडाले होते. तारा आणि सिद्धार्थ विक्रम बत्राच्या बायोपिक मध्ये काम करत आहे.

आपल्या येणाऱ्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सिद्धार्थने एका मुलाखतीत या अफवांवर उत्तर दिले आहे. तो बोला,”या सगळ्या जबरदस्तीच्या अफवा आहेत,  आणि कोणतीही जबरदस्तीच्या गोष्टी चांगली नसतात.”

सिद्धार्थ आलियाला डेट करत होता. पण अलीकडेच त्यांचा ब्रेकअप झाला आहे. आलिया आणि सिद्धार्थ करण जौहरच्या ‘स्टूडेंट ऑफ दी ईयर’ चित्रपटात एकत्रित दिसले होते. सध्या आलिया ब्रह्रास्त्र चित्रपटात व्यस्त आहे. तर या चित्रपटात आलिया सोबत रणबीर कपूरही दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलिया सध्या रणबीरला डेट करत आहे.

जबरिया जोड़ी चित्रपटातील सिद्धार्थचा बिहारी एक्सेंट प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. चित्रपटाबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला, “आता पर्यंत ट्रेलर पाहून लोकांचे चांगले कंमेंट्स ऐकायला मिळाले. यामुळे मी खूप आनंदी आहे. मी अभय सिंह या भूमिकेत तुम्हाला दिसणार आहे. माझ्यासाठी हा अनुभव नवीनच होता.” या चित्रपटात सिद्धार्थ सोबत परिणीति चोपड़ा असणार आहे.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?