देशाला 9 हजार कोटींचा चुना लावून ‘फरार’ झालेल्या विजय माल्याचा मुलगा सिध्दार्थ जगतोय ‘अशी’ लक्झरी लाईफ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील बँकांना 9 हजार कोटीला चूना लावून फरार झालेला उद्योजक विजय माल्या या दिवसात लंडनमध्ये निर्वासिताचे जीवन जगत आहे. तर माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्या सुखी जीवन जगत आहे. सिद्धार्थ माल्या सोशल मिडियावर खूपच सक्रिय आहे. तो नेहमीच सोशल मिडियावर आपल्या अनेक दिवसभरातील घडामोडी शेअर करत असतो.

हा फोटो सिद्धार्थने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो एफ – 1 रेस मध्ये ट्रँकजवळ मजा करताना दिसत आहे.

सिद्धार्थने बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी आणि ड्यूक बंटर यांच्याबरोबर लॉस एंजेलिसमधील सेंट्रल पार्क मधील फोटो शेअर केला आहे.

सिद्धार्थने या फोटोमध्ये क्रिकेटर क्रिस गेल बरोबर पार्टी करताना फोटो शेअर केला ज्यात तो अनेक मॉडल्सबरोबर दिसत आहे.

या मजामस्तीबरोबरच सिद्धार्थला हायब्रिड कुत्रे पाळण्याचा देखील छंद आहे. त्याने हा फोटो शेअर करत लिहिले की मी अशा प्रकारे कायम जगू शकतो.

ऑस्ट्रियाच्या वियानामध्ये मॉडल विक्टोरिया बेकर हार्बरबरोबर तो पार्टीमध्ये डान्स करताना दिसत आहे.
सिद्धार्थने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या बरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ मलिबु बीचवर आपला मित्र आशीष दूगर यांच्याबरोबर दिसत आहे.

visit : Policenama.com 

You might also like