‘माझ्या बायकोला या सगळ्यापासून दूरच ठेव’, सुशांतच्या जीजूनं केलेले ‘ते’ What App मेसेज सोशलवर व्हायरल

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रोज काही ना काही खुलासे होताना दिसत आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पीठानी यानं आता काही खुलासे केले आहेत. सुशांतचे जीजू ओ पी सिंह यांच्या व्हॉट्स अॅप मेसेजचे स्क्रीनशॉट त्यानं शेअर केले आहेत जे सुशांतनं जीजूकडून आल्यानंतर त्याला फॉरवर्ड केले होते. यात दिसत आहे की ओ पी सिंह यांनी सुशांतला त्यांच्या पत्नीपासून म्हणजेच सुशांतच्या बहिणीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सगळेच मेसेज सिद्धार्थनं मुंबई पोलिसांकडे सोपलवले आहेत. सुशांतचे मित्र आणि कुटुंबीय त्याच्या अलीकडच्या काळातील वागण्यामुळं नाराज होते असा अर्थही या मेसेजमधून काढला जात आहे.

काय आहेत मेसेज

पहिल्या मेसेजमध्ये असा उल्लेख आहे की, चंदीगढला पोहोचलो. मुंबईला बोलावल्याबद्दल आभार. मला माझ्या जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळाली. तुझ्यावर तुझे करिअर आणि घरची जबाबदारी नाही. मी योग्य अंदाज लावला आणि त्यानुसार माझ्या प्रवासाचे नियोजन केले.

दुसऱ्या मेसेजमध्ये असा उल्लेख आहे की, कृपया माझ्या पत्नीला तुझ्या समस्यांपासून दूरच ठेव. कारण तुझा मित्र परिवार, तुझ्या वाईट सवयी आणि मिसमॅनेजमेंटचा तिला त्रास होईल. तसं मी काळजी घेईलच की, तिला काही त्रास होऊ नये. कारण ती खूप चांगली आहे.

तिसऱ्या मेसेजमध्ये असाही उल्लेख आहे की, मी एकच अशी व्यक्ती आहे जी तुला मदत करू शकते. मी तुला मदत करायला तयार आहे. जे कुणी तुझी देखभाल करत आहेत तुझी गर्लफ्रेंड, तिचे कुटुंब, तुझा मॅनेजर त्यांना सांग मी तुझी मदत करेन.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like