शिवाजीनगर पुन्हा भाजपकडे, सिद्धार्थ शिरोळे 5124 मतांनी विजयी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांचा 5124 मतांनी विजय झाला आहे. चुरशीच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे 2490 मतांनी आघाडीवर गेले होते . पहिल्या चार फेऱ्या काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट हे शिरोळे यांच्यापेक्षा आघाडीवर होते. पाचव्या फेरीनंतर भाजपने या मतदारसंघात आघाडीवर आघाडी घेतली होती.

2014 ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे लढल्याने राष्ट्रवादीकडून अनिल भोसलेलेंनी इथून निवडणूक लढवली होती. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. भाजपचे विजय काळे आमदार झाले होते. भाजपने लोकसभेला गिरीश बापट यांना उमेदवारी देत विद्यमान खासदार असलेले अनिल शिरोळे यांना उमेदवारी डावलली होती. मात्र विधानसभेला अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देत अनिल शिरोळे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. मुलाच्या राजकीय कारकिर्दीसाठी वडिलांनी माघार घेतल्याचं त्यावेळी बोललं गेलं.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ –

1) सिद्धार्थ अनिल शिरोळे (भाजप) 58727
2) दत्ता बहिरट (काँग्रेस ) 53603
3) निम्हण सुहास भगवानराव (मनसे) 5272
4) गायकवाड सत्यवान बबन (बहुजन समाज पार्टी) 883
5) अनिल शंकर कुऱ्हाडे (वंचित बहुजन अघाडी) 10454
6) कैलास द. गायकवाड (हिन्दुस्तान जनता पार्टी) 331
7) मुकुंद किर्द (आम आदमी पार्टी) 709
8) अंजनेय साठे (अपक्ष ) 726
9) ॲन्थोनी ॲलेक्स (अपक्ष ) 137
10) तुरेकर संजय हनुमंत (अपक्ष ) 247
11) फिरोज शमसुद्दीन मुल्ला (अपक्ष ) 278
12) रविंद्र बन्सीराम महापुरे (अपक्ष ) 139
13) श्रीकांत मधुसूदन जगताप (अपक्ष ) 174
14) NOTA 2390

Visit : Policenama.com