Siddheshwar Sugar Factory | सिद्धेश्‍वर कारखाना बंद करण्याचे आदेश

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Siddheshwar Sugar Factory | श्री सिद्धेश्‍वर कारखाना बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) दिले आहेत. महापालिकेची किंंवा विमानतळ विकास प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेताच या कारखान्याने (Siddheshwar Sugar Factory) को-जनरेशनची 90 मीटर चिमणी (Chimney) उभा केली आहे. म्हणून ही बेकायदेशीर चिमणी पाडकामाची कार्यवाही पालिकेनं घेतलीय. कोर्टातील 2 याचिकांमुळे तूर्तास चिमणी पाडकाम थांबलेय. मात्र, को-जनरेशन करताना (प्रदर्शन) कारखान्याने पर्यावरण विभागाची (Department of Environment) परवानगीच घेतली नसल्याचं समोर आलंय. यामुळे याबाबत कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे समजते.

 

राष्ट्रीय हरित लवादाच्या (National Green Arbitration) आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्याला 96 तासांची मुदत दिली आहे.
त्यामुळे मुदत संपण्याआधी कारखाना बंद करा, नाहीतर कायदेशीर कारवाईचे पत्र देण्यात आले आहेत.
सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची को-जनरेशनची चिमणी होटगी रोडवरील विमानतळासाठी अडथळा ठरलीय.
चिमणीमुळे विमानसेवा सुरू होत नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झालेय.
मात्र, त्यासाठी गेल्या काही वर्षापासून न्यायालयीन लढा सुरूय.
राष्ट्रीय हरित लवादाकडे कारखान्याकडून होत असलेल्या प्रदूषणाची गंभीर दखल घेण्यात आलीय. (Siddheshwar Sugar Factory)

 

दरम्यान, 2017 मध्ये चिमणी पाडकामाचा प्रयत्न झाला आहे, पण, त्यावेळी प्रशासनाला शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रिकाम्या हाताने परतावे लागले होते.
तसेच, संजय थोबडे (Sanjay Thobde) यांनी याबाबत सतत पाठपुरावा केला. त्यांनीच राष्ट्रीय हरित लवादाकडे आव्हान केले होते.
तर, राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचा आधार घेत प्रदूषण मंडळाचे विभागीय प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे (Nitin Shinde) यांनी कारखान्याला पत्र पाठवून आगामी 96 तासांत कारखाना बंद ठेवण्याचे आदेश दिलेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाला त्यांनी त्यासंबंधीचा अहवाल मागविला होता.
त्याला आता अंतिम स्वरूप प्राप्त झालेले दिसते. तर, पुढील आठवड्यात कारखान्याने चिमणी पाडकामाला मागितलेल्या स्थगितीवर सुनावणी होणार असल्याने या सुनावणीकडे लक्ष लागून आहे.

 

Web Title : Siddheshwar Sugar Factory | Maharashtra pollution control board orders closure of siddheshwar sugar factory solapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Punit Pathak | प्रसिद्ध कोरियोग्राफरने पहिल्यांदा पत्नीला झोपेतून उठवलं अन् झाला रोमँटीक, बेडरुम व्हिडीओ झाला व्हायरल

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 942 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Miesha Iyer | मायशा अय्यर आणि ईशान सेहगालचा हाॅटेलच्या कोपऱ्यातील ‘तो’ व्हिडीओ इंटरनेटवर झाला व्हायरल