कपिल शर्माच्या शो मधून ‘सिद्धू’ यांची हकालपट्टी

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. यात ४४ जवान शहीद झाले. त्यानंतर देशभर या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी पाकिस्तान वारी करुन आलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी मात्र ‘काही लोंकांसाठी देशाला जबाबदार धरू नका’ अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे नेटकरी सिद्धू यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. एव्हढेच नाही तर त्यांना कपिल शर्माच्या शो मधून काढून टाकण्याची मागणी देखील करण्यात येत आहे. त्यामुळे आता कपिल शर्मा च्या शो मधून सिद्धूची हकालपट्टी करण्यात येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष होते मात्र आता सिद्धू यांची या शो मधून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. एवढेच नाही तर त्यांच्या जागी अभिनेत्री अर्चना पूरन सिंग यांची वर्णी लागणार अशी माहिती देखील सूत्रांची दिली आहे.

ट्विटरवर #boycottsidhu टॉप ट्रेंड 
सिद्धू यांच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी सिद्धू यांना चांगलेच धरेवर धरले आहे. ट्विटरवर सध्या #boycottsidhuअसा ट्रेंडच चालू आहे. एवढेच नाही तर हा ट्रेंड ट्विटरवर नंबर १ ला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे सिद्धू यांना हे वक्तव्य चांगलेच महागात पडले आहे यात शंका नाही. कपील शर्माच्या शो मधून तर त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहेच पण आता त्यांना नेटकऱ्यांचा देखील भडीमार सोसावा लागत आहे.
विशेष म्हणजे कपिल शर्मा याचा शो येणाऱ्या सोनी टीव्ही चे देखील चॅनल खरेदी करणार नसल्याचे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यामुळे सिद्धू यांच्या वक्तव्याचा फटका सोनी टीव्हीला देखील सहन करावा लागत आहे.

https://twitter.com/imsachiii/status/1096622989557227520