Side Effect Of Feeder Milk And Sipper Cup | तुमचं बाळ प्लॅस्टिकच्या बाटलीतून दूध पित असेल तर सावधान; जाणून घ्या ‘हे’ भयानक सत्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आईचे दूध हे बाळासाठी अमृतच मानले जाते. परंतु काही स्त्रिया या आपली फिगर खराब व्हायला नको म्हणून बाटलीतून दूध (Side Effect Of Feeder Milk And Sipper Cup) पाजतात. तर काहींना अडचणींमुळे तसे करावे लागते. पण प्लॅस्टिकची बाटली (Plastic Bottle) ही आतून चांगली राहावी म्हणून तिला काही रसायने (Chemicals) लावली जातात. कालांतराने ही रसायने बाटलीतून पोटात जाऊन बाळाच्या आरोग्यावर (Baby Health) घातक परिणाम करतात (Side Effect Of Feeder Milk And Sipper Cup).

 

देशातील विविध राज्यांमध्ये विकल्या जाणार्‍या दुधाच्या बाटल्या आणि सिपरमध्ये लावण्यात येणारी रसायने अतिशय घातक असतात. दिल्लीतील एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या संशोधनातून (Side Effect Of Feeder Milk And Sipper Cup) ही बाब समोर आली आहे. जर तुम्ही आपल्या मुलांवर अधिक प्रेम करीत असाल तर या गोष्टीची नक्कीच दखल घ्याल.

 

लहान मुलांच्या दुधाच्या बाटल्या (Feeder Milk) आणि सिपर कप (Sipper Cup) हे दूध वापरल्यानंतर चांगले राहावेत, यासाठी त्यामध्ये काही रसायने वापरली जात असल्याच यापूर्वीही संशोधनातून उघड झालं आहे. लहान मुलांसाठी वापरण्यात येणार्‍या दुधाच्या बाटल्यांमध्ये बिस्फेनॉल-ए (Bisphenol-A) हे विशिष्ट प्रकारचे रसायन आढळून आले आहे. ते बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक (Harmful To Baby’s Health) असून त्याच्या विपरित परिणामामुळे भविष्यात मुलांना विविध प्रकारचे आजार होऊ शकतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

दिल्लीतील टॉक्सिक लिंक (Toxic Link) या संस्थेने देशाच्या विविध भागांतून बाटल्या आणि सिपर्स गोळा करून त्यावर संशोधन केले. त्यातून देशाच्या बाजारात विकल्या जाणार्‍या दुधाच्या बाटल्या आणि सिपर मुलांसाठी सुरक्षित नाहीत. असा दावा करण्यात आला आहे.गेल्या चार वर्षांत दुसर्‍यांदा प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासपूर्ण अहवालात बीआयएसचे (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स) उघडपणे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

स्वस्त बाटल्यांपासून सावध (Beware Of Cheap Feeder Milk)
स्वस्त आणि निकृष्ट दर्जाच्या कंपनी असलेल्या साधारणतः दुधाच्या बाटल्या मऊ व चांगल्या अवस्थेत राहण्यासाठी त्यावर रसायनांचा लेप लावला जातो.
तसेच, बाटली जास्त काळ खराब होत नाही. गरम दूध किंवा पाणी बाटलीत ओतल की, हे रसायनही विरघळून दूध किंवा पाण्याबरोबर बाळाच्या शरीरात जाते.
हे रसायन पोट (Stomach) आणि आतड्यांमधील (Intestine) मार्ग बंद करते. कधीकधी यामुळे जीवालाही धोका निर्माण होतो.
एवढेच नव्हे तर बराच काळ दुधामार्फत शरीरात हे रसायन जात असल्याने बाळाला हृदय (Heart),
किडनी (Kidney), यकृत (Liver) आणि फुफ्फुसाचा (Lungs) आजार होऊ शकतो.

घशात सूज येण्याचा धोका – सतत बाटलीतून दूध पाजल्याने बाळाच्या घशाला सूज येते. त्याला अतिसारचा (Diarrhea) त्रासही होऊ शकतो.
म्हणून नेहमी मेडिकेडेटच्या बाटल्या वापरा. मेडिकल स्टोअरमध्ये दर्जेदार बाटल्या उपलब्ध असतात.
पॉलीकार्बोनेटपासून (Polycarbonate) बनवलेल्या बेबी बॉटलवर (Baby Bottle) २०१५ मध्येच बीआयएसने (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स) बंदी घातली होती.
पण तरीही या बाटल्या बाजारात आजही उपलब्ध असून त्या मुलांच्या आजारांचे प्रमुख कारण बनल्या आहेत.
यावर सध्या कोणत्याही कायद्याचा अंकुश नसल्याचा फायदा अनेक कंपन्या घेत असून मात्र,
त्याचा त्रास देशाचे उद्याचे नागरिक असलेल्या छोट्या छोट्या मुलांना होत आहे.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Side Effect Of Feeder Milk And Sipper Cup | side effect of feeder milk and sipper cup on your baby health sore throat bisphenol a harmful chemical

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune New Tehsil Office | पुण्यातील हवेली तालुक्याचे विभाजन करुन 2 तहसिलदार कार्यालय होणार

 

Nana Patole | ‘पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच’; नाना पटोलेंचा पुन्हा एकला चलो रे नारा!

 

Dilip Walse Patil | ‘मी देखील थोडा कायदा शिकलोय’; असं का म्हणाले गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील