तुम्ही देखील ‘ग्रीन टी’चं सेवन करताना ‘या’ चुका करता का ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हृदयरोग, पचनक्रिया, रोगप्रतिकारक शक्ती, मेटाबॉलिजमसाठी ग्रीन टी फायद्याची मानली जाते. परंतु ग्रीन टीचा दैनंदिन जीवनात समावेश करताना काही गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्या कोणत्या आहेत जाणून घेऊयात.

येऊ शकतात ‘या’ समस्या

– ग्रीन टी मधील कॅफीन आणि टॅनिंसमुळं शरीरात अॅसिडचं प्रमाण वाढतं. हे अॅसिड पचनक्रियेत समस्या निर्माण करतं. यामुळं पोट बिघडू शकतं.

– यामुळं जळजळ, पोटदुखी, सतत जांभया येणं अशा समस्या येण्याची शक्यता असते.

– ज्यांना पेप्टीक अल्सर, अॅसिडीटी किंवा अॅसिड रिफलक्ससारख्या समस्या आहेत त्यांनी ग्रीन टी घेऊ नये.

कसा कमी कराल त्रास ?

विविध शोधातून हे समोर आलं आहे की, चहामुळं गॅस्ट्रीक अॅसिड वाढतं. म्हणून रिकाम्या पोटी कधीच याचं सेवन करू नये. अॅसिडीटीचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी यात थोडं दूधही वापरू शकता.

काय आहेत फायदे ?

1) वजन कमी होतं – ग्रीन टीमधील एपिगॅलोकॅटोकिन तुमचं मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी तसंच जास्त लागणारी भूक कमी करण्यासाठी मदत करतं. एपिगॅलोकॅटोकिन या घटकामुळं शरीरात उष्णता निर्माण होते. 2-4 कप ग्रीन टी मुळं 70-80 कॅलरीज नियमित कमी होतात. यामुळं दिवसभर फ्रेश वाटतं. भूकेवर नियंत्रण राहिल्यामुळं फॅट बर्निंग कपॅसिटी वाढते.

2) कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं – यामुळं शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहतं. रक्तवाहिन्या मोकळ्या राहिल्यानं शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं. हृदयाचं कार्यही सुधारतं. हृदयरोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा खूप फायदा होतो.

3) रोगप्रतिकारक शक्ती वाढते – यातील अँटीबॅक्टेरियल घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. यामुळं पुन्हा पुन्हा येणारा ताप, अंगदुखी दूर होण्यास मदत होते.