Side Effects OF Beetroot | ‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नये बीट, बिघडू शकते तब्येत; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Side Effects OF Beetroot | बीटरूट (Beetroot) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये विविध आवश्यक व्हिटॅमिन (vitamin) आणि खनिजे असतात. याचा आरोग्यावर अनेक प्रकारे सकारात्मक प्रभाव पडतो. बीटचे सेवन केल्यास प्रथिने (protein), फायबर (fiber), व्हिटॅमिन सी (vitamin c), फोलेट (Folate)आणि आयर्न (iron) मिळते. (Side Effects OF Beetroot)

 

बीटरूटमध्ये भरपूर व्हिटॅमिन आणि खनिजे असल्याने आहारात त्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. पण प्रत्येक माणूस जसा वेगळा असतो, त्याचप्रमाणे त्याचे शरीरही वेगळे असते. त्याप्रमाणे, त्याच्या सेवनाने शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम होतात.

 

मात्र, असेही लोक आहेत ज्यांना बीटरूट न खाण्याचा सल्ला दिला जातो. कोणत्या लोकांनी बीटरूटचे सेवन करू नये, ते जाणून घेवूयात. (Side Effects OF Beetroot)

 

1. किडनी स्टोन (Kidney Stone) ची समस्या –
किडनी स्टोनचे दोन प्रकार आहेत. पहिला कॅल्शियम आधारित आणि दुसरा ऑक्सलेट बेस. जर एखाद्या व्यक्तीला ऑक्सलेट आधारित किडनी स्टोनची समस्या असेल तर त्याने बीटरूट खाणे टाळावे.

2. आयर्नचे प्रमाण जास्त असल्यास –
शरीरात जास्त प्रमाणात कॉपर किंवा आयर्न जमा होत असेल तर त्यांनी बीटरूटचे सेवन विचारपूर्वक करावे. कारण बीटरूटमध्ये असे काही घटक आढळतात, जे शरीरात आयर्न आणि कॉपरचे प्रमाण वाढवतात, ज्यामुळे समस्या उद्भवू शकतात.

 

3. लघवीच्या (Urination) रंगात बदल –
अनेक वेळा असे येते की, जे लोक बीटरूटचे सेवन गरजेपेक्षा जास्त करतात, त्यांच्या लघवीचा रंग बदलून लाल होतो. हे देखील एक असे लक्षण आहे ज्याचा अर्थ तुमच्या शरीरात काहीतरी चुकीचे होत आहे आणि म्हणून तुम्ही बीटरूटचे सेवन टाळावे.

 

Web Title :- Side Effects OF Beetroot | these people should not forget to eat beetroot and side effects of beetroot
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Restrictions in Maharashtra | आज रात्रीपासून महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागणार? सरकारची टास्क फोर्सबरोबर बैठक संपली

 

Pune Crime | हॉटेलच्या व्यवसायातून 55 लाखाची फसवणूक, पुण्यात रवीअण्णा दांडेली आणि रमेश भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल

 

Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी, द क्रिकेटर्स क्लब संघांची विजयी सलामी !

 

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दररोज 50 रुपयांची बचत तुम्हाला रिटर्नमध्ये देईल 35 लाख रुपये; समजून घ्या गणित