अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी खाऊ नका गर्भनिरोधक गोळ्या, होतात ‘हे’ साईड इफेक्ट

पोलीसनामा ऑनलाइन – बाजारामध्ये अशा अनेक गर्भनिरोधक गोळ्या आहेत ज्या महिलांना असुरक्षित संभोगानंतर 72 तासांच्या आत खाव्या लागतात. यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. परंतु ही गोळी खाण्याचे बरेच दुष्परिणाम आहेत.

कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स 0.75 MG Tablet खाल्ल्यानंतर बर्‍याच महिलांना श्वास घेताना त्रास जाणवतो. ज्यांना आधीच श्वासासंदर्भात समस्या होरी, त्यांच्यासाठी परिस्थिती अधिक वेदनादायक होते.

गर्भ निरोधक गोळ्या खाल्ल्यानंतर अनेक स्त्रियांना ओठ, चेहरा, पापण्या, जीभ, हात व पायांना सूज आल्यासारखे वाटते. कधीकधी ही सूज देखील वेदनादायक असते.

0.75 एमजी टॅब्लेट खाल्ल्यानंतर बर्‍याच स्त्रियांना पोटात दुखण्याची तक्रार होते. ओटीपोटात होणाऱ्या वेदना गर्भनिरोधक गोळी घेतल्यामुळे होऊ शकते.

ज्या मुलींनी असुरक्षित संबंधानंतर गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्या त्यांना मासिक पाळी दरम्यान त्रास आणि जबरदस्त रक्तस्त्राव होण्याची समस्याही येते. बर्‍याच मुलींना मासिक पाळीच्या तारखेतील बदल देखील जाणवतो.

बर्‍याच वेळा गर्भनिरोधक गोळ्यांमुळे काही महिलांना चक्कर येणे आणि सतत उलट्यांचा त्रास जाणवतो.

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतर महिलांना थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. काही स्त्रियांच्या लिबिडोमध्येही बदल पाहिले गेले आणि काहींना स्तनांमध्ये वेदना आणि ताठरपणा जाणवला.