Side Effects Of Lemon Water | लिंबू पाणी प्यायल्याने शरीरावर होतात ‘हे’ विपरीत परिणाम; जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन टीम : सध्या उन्हाळ्याचे दिवस (Summer Season) सुरू झाले आहेत. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. या दिवसांमध्ये आपल्याला सतत थंड गार पदार्थ खाऊ वाटतात. (Side Effects Of Lemon Water) त्यामध्ये जास्त करून आपल्याला थंड पेय (Cold Drinks) प्यायला छान वाटते. यामध्ये लिंबूपाण्याचा (Lemon Water) नंबर सगळ्यात वरती लागतो. (Side Effects Of Lemon Water) परंतू तुम्हाला माहित आहे का, जास्त प्रमाणात प्यायल्याने आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो ?  नसेल माहित तर, काळजी करू नका कारण आज आम्ही तुम्हाला ते सांगणार आहोत.

 

– दातांवर वाईट परिणाम होतो (Bad Effect On Teeth) : रोज लिंबू पाणी प्यायल्याने दातांचा इनॅमल (Enamel) खराब होतो. दात किडणे देखील होऊ शकते. लिंबाच्या रसामध्ये असलेल्या ऍसिडमुळे ही समस्या होतो. एका अभ्यासानुसार, लिंबू अत्यंत आम्लयुक्त असते. त्यामुळे वारंवार लिंबू पाणी प्यायल्याने तुमच्या दातांच्या मुलामा खराब होऊ शकतात. (Side Effects Of Lemon Water) त्यामुळे लिंबू पाणी किंवा अशा कोणत्याही पदार्थाचे सेवन केल्यानंतर लगेच दात घासा.

– मायग्रेनचा त्रास वाढू शकतो (Migraine Pain May Increase) : आरोग्य तज्ञांच्या मते, लिंबूसारख्या लिंबूवर्गीय फळांचे जास्त सेवन केल्याने देखील मायग्रेनची समस्या (Migraine Problems) उद्भवू शकते. एका अभ्यासानुसार समोर आले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला आधीच मायग्रेनची समस्या असेल तर त्याने लिंबूचे सेवन करताना काळजी घ्यावी.

 

– छातीत जळजळ आणि अल्सर (Heartburn And Ulcers) :
एका संशोधनानुसार, लिंबूपाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने छातीत जळजळ होण्याची समस्या वाढू शकते
कारण ते प्रोटीन ब्रेकिंगएन्झाइम पेप्सिन सक्रिय करते.
लिंबूपाणी जास्त प्रमाणात सेवन केल्याने पेप्टिक अल्सरची स्थिती अधिक धोकादायक बनू शकते.
तसेच अल्सर हे अति अम्लीय रसामुळे होतात.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Side Effects Of Lemon Water | lemon water side effects consuming too much lemon can also cause ulcers along with spoiling the teeth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा