Side Effects Tomatoes | टमाट्याचे दुष्परिणाम ! जास्त प्रमाणात टमाटे खाल्ल्याने होऊ शकतात 5 प्रकारचे आजार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Side Effects Tomatoes | तजेलदार टमाटा (Tomato) हा त्याच्या आंबट-गोड चवीमुळे सर्वांचा आवडता आहे. त्याच्या चव विशेषतः लहान मुलांना खुप आवडते. मात्र, त्याच्यातील विशिष्ट रसायनामुळे अधिक सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीसह (Acidity) पाच प्रकारचे आजार होऊ शकतात (Side Effects Tomatoes).

 

टमाटा हे भाजीवर्गीय फळ आहे. त्याच्या आंबटगोड चवीमुळे त्याचा सर्व प्रकारच्या सॅलडमध्ये (Salad) किंवा खाद्यपदार्थांमध्ये वापर करतात. टमाट्यामध्ये सी व्हीटामिन (Vitamin C) भरपूर असते. तसेच त्यात असणार्‍या लाइकोपीनमुळे (Lycopene) छातीत आणि पोटात जळजळ होते. म्हणजेच अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. जास्त टमाटे हानिकारक (Side Effects Tomatoes) असल्याचे सिद्ध झाले आहे.

 

आम्लपित्त (Bile Acid) –
टमाट्यात आम्ल गुणधर्म (Acid Properties) असतात. त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने छातीत जळजळ किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास उद्भवतो. आपल्याला जर अगोदरच अ‍ॅसिडिटीचा त्रास असेल तर टमाट्याचे सेवन करताना काळजी घ्या.

 

त्वचेच्या रंगावर परिणाम (Effects On Skin Tone) –
टमाटा जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्याला त्वचेवर (Skin) त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. रक्तातील लाइकोपीनची पातळी (Lycopene Level) त्वचेचा रंग बदलू शकते आणि त्वचा शुष्क होते.

अ‍ॅलर्जी (Allergy) –
हिस्टामाइन (Histamine) हा एक घातक घटक टमाट्यामध्ये असतो. त्यामुळे खोकला (Cough), शिंका येणे (Sneezing), त्वचेवर पुरळ उठणे (Skin Rashes) आणि घशात खाज सुटणे (Sore Throat) यासारखे त्रास होतात. त्यामुळे तुम्हाला जर अ‍ॅलर्जी असेल तर टमाट्यापासून सुरक्षित अंतर ठेवा.

 

सांधेदुखी (Joint Pain) –
टमाट्यामध्ये सोलॅनिन (Solanine) नावाचा अल्कलॉइड (Alkaloids) असतो, ज्याच्यामुळे सांध्यांमध्ये दाह आणि वेदना होतात.
टमाट्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने ऊतींमध्ये कॅल्शियम तयार होण्याचा धोका वाढून सांध्यामध्ये जळजळ देखील होऊ शकते.
आपल्याला जर सांधेदुखी असेल तर मग टमाटा मर्यादेतच खा.

 

मूतखडा (Kidney Stone) –
टमाटा भरपूर प्रमाणात खाल्ल्यास टमाट्यामधील रासायनिक घटकांमुळे मूत्रपिंडात खडे तयार होऊ शकतात.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Side Effects Tomatoes | 5 side effects that can happen when you eat too many tomatoes
 

#हेल्दी लाइफस्टाइल #हेल्दी डाइट #टोमॅटोचे फायदे #टोमॅटोचे नुकसान #lifestyle #Health #Health Tips #Healthy Lifestyle #Tomato Benefits #Tomato Side Effects #Tomato For Acidity #Healthy Diet #हेल्थ टिप्स #Lifestyle and Relationship #Health and Medicine

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘एकच वादा अजित दादा’ ! पुण्यात उद्घाटनांचा धुमधडाका, एकाच दिवशी 19 कार्यक्रम अन् 27 उद्घाटन

 

Chitra Wagh | ‘एकटा देवेंद्र काय करणार विचारणार्‍यांना पुन्हा एकदा करारा जवाब’ – चित्रा वाघ

 

UP Assembly Election Results | शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार ? UP च्या निकालावर संजय राऊत म्हणाले – ‘योगी आदित्यनाथ पुढे जाणारच होते, पण…’