Sidharth-Kiara Wedding | कियारा-सिद्धार्थच्या लग्नाच्या फोटोंनी रचला नवा विक्रम; अनुष्का-कतरिना-आलियाला देखील टाकले मागे

पोलीसनामा ऑनलाईन : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवणी (Sidharth-Kiara Wedding) हे गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवणीची पहिली भेट ही ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीत झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ‘शेरशाह’ या चित्रपटात दोघांनी एकत्र कामदेखील केलं होतं. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांनाही खूप आवडली.अखेर 7 फेब्रुवारीला कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth-Kiara Wedding) यांनी लग्नगाठ बांधली.

राजस्थानमधील जैसलमेरमधल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये अगदी शाहीथाटात हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना ‘नो फोन पॉलिसी’चं पालन करावं लागल्याने सोशल मीडियावर कोणतेच फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल झाले नाहीत. मात्र मंगळवारी रात्री कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट केले होते.‘आता आमची पर्मनंट बुकिंग झाली आहे. आमच्या पुढील प्रवासासाठी आम्हाला सर्वांचा आशीर्वाद आणि प्रेम हवंय’, असं कॅप्शन देत कियारा आणि सिद्धार्थने लग्नाचे फोटो पोस्ट केले होते.

त्यांच्या या फोटोंना भरपूर प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
शिवाय हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील होत आहे.
त्यामुळेच सिद्धार्थ-कियाराच्या (Sidharth-Kiara Wedding) फोटोंनी नवा विक्रम स्थापित केला आहे.
सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाच्या फोटोला इन्स्टाग्रामवर तब्बल 23 मिलियन व्युव्ह मिळाले आहेत.
यापूर्वी हा विक्रम अभिनेत्री कतरिना कैफ -विकी यांच्यानावे होता.
त्यांच्या लग्नाच्या फोटोला 20.4 मिलियन व्युव्ह मिळाले होते.
तर जानेवारीमध्ये अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के. एल. राहूल यांचं लग्न झालं होत.
आणि त्यांच्या लग्नाच्या फोटोला 8.3 मिलियन वूव्ह मिळाले.

Web Title :- Sidharth-Kiara Wedding | siddharth kiara wedding photo set a new record see instagram views