Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding | सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील संगीत पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन : सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding) यांच्या लग्नाची. ऑगस्ट 2021 मध्ये आलेल्या ‘शेरशहा’ या चित्रपटात सिद्धार्थ आणि कियारा दोघंही एकत्र होते तेव्हा पासून त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता याआधीही ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा येत्या 7 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत.

कियारा आणि सिद्धार्थ डेस्टिनेशन वेडींग करणार असून त्यासाठी त्यांनी राजस्थानमधील जैसलमेर सूर्यगढ पॅलेस ही जागा निवडली आहे. कियारा आपल्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांसोबत जैसलमेर येथे पोहचली आहे. तिच्यासोबत बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राही होता. त्यानंतर काहीच वेळानं रात्री सिद्धार्थंही जैसलमेरसाठी रवाना झाला असून तोही वेडिंग व्हेन्यूवर पोहचला आहे. त्याचसोबत करण जोहर, शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांसह अनेक कलाकार हे जैसलमेरला पोहोचले. (Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding)

या शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येत आहे. मात्र याबद्दल कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेस कियारा-सिद्धार्थने बुक केला आहे. या व्हिलामध्ये तब्बल 84 खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. त्यातच आता कियारा- सिद्धार्थच्या संगीत पार्टीच्या तयारी चालू असतानाच पहिला व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी अनेक मोठमोठे झुंबर, पाहुण्यांची बैठक व्यवस्था आणि मध्यभागी उभारण्यात आलेला स्टेज पाहायला मिळत आहे.

राजस्थानच्या सूर्यगढ पॅलेसमधील एका ठिकाणी संगीतासाठी मंडप उभारण्यात येत असल्याचे यात दिसत आहे.
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या संगीत कार्यक्रमात डान्स केल्याचे बोललं जात आहे.

Web Title :-  Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding | sidharth malhotra kiara advani wedding update sangeet ceremony video social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यातील ”त्या” पोस्टरने खळबळ; भाजपच्या गोटात वाढली चिंता

Satara Crime News | साताऱ्यातील ‘त्या’ खुनातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश; दापोलीमधून आरोपींना अटक

Pune Crime News | स्त्रीधन, पोटगी म्हणून मिळालेली रक्कम लांबवली; मुलीने आपल्याच वडिल, भावाविरुद्ध दिली तक्रार