सुपरहिट साऊथ सिनेमा ‘Thadam’च्या हिंदी रिमेकमध्ये ‘या’ बॉलिवूड स्टारची ‘एन्ट्री’, करणार ‘डबल रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शाहिद कपूर स्टार कबीर सिंह सिनेमा हिट झाल्यानंतर आता साऊथ सिनेमांचा हिंदी रिमेक तयार केला जाताना दिसत आहे. सध्या निर्माते आणि दिग्दर्शक सुपरहिट दक्षिण भारतीय सिनेमांच्या रिमेकमध्ये व्यस्त झाले आहेत. या यादीत आता आणखी एक नाव अ‍ॅड झालं आहे. तमिळ सिनेमातील ब्लॉकबस्टर सिनेमा थडम या सिनेमाच्या हिंदी रिेमेकच्या जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. समोर आलेल्या लेटेस्ट रिपोर्टनुसार मेकर्सनं या सिनेमासाठी एका जबरदस्त बॉलिवूड स्टारच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार थडम सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये मरजावा सिनेमातील सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्यानं या सिनेमासाठी होकार दिला असून याच वर्षी मे महिन्यात या सिनेमाची शुटींग सुरू होणार आहे. सिनेमाची खास बात अशी की, या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा डबल रोल करताना दिसणार आहे. या सिनेमातील एक भूमिका श्रीमंत बिजनेसमनची असेल तर एक भूमिका टपोरी गुंड्याची असणार आहे.

View this post on Instagram

2️⃣0️⃣

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra) on

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सिनेमाची शुटींग दिल्लीतल्या रिअल लोकेशन्सवर होणार आहे. यात एक चेसिंग सीक्वेंसही आहे. व्यस्त रस्त्यावर हा सीन शुट केला जाणार आहे. लवकरच सिद्धार्थ लुक टेस्ट करणार आहे. एप्रिलपासून तो सिनेमाच्या वर्कशॉपमध्ये बिजी होणार आहे.

सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं आता मरजावां सिनेमानंतर आता तो शेरशाह सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात कियारा आडवाणीही असणार आहे. याशिवाय सिद्धार्थ रकुल प्रीत सिंह आणि अजय देवगण स्टारर इंद्र कुमार या कॉमेडी सिनेमातही दिसणार आहे.

View this post on Instagram

Monochrome or Polychrome? 💬

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra) on

You might also like