तैमूरला ‘किड्नॅप’ करु इच्छित होता ‘हा’ अभिनेता, कपिल शर्माच्या शोमध्ये केला ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्राची जोडी सिल्वर स्क्रिनवर पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हे दोघे ‘जबरिया जोडी’ मध्ये बिंदास भूमिका साकारताना दिसणार आहे. दोघेही आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खूप व्यस्त आहे. दोघेही नुकतेच कपिल शर्माच्या शो मध्ये पोहचले होते.

कपिल शर्माच्या शोमध्ये कपिलने त्या दोघांना एक प्रश्न विचारला की, जर तुम्हाला तुमच्या जीवनात कोणाला किड्नॅप करायचे असेल तर कोणाला कराल ? अभिनेत्री परिणीती चोप्रा म्हणाली की, सैफ अली खानला किड्नॅप करेल. या आधी देखील परिणीतीने ही गोष्टी सांगितली होती की, ती सैफ अली खानला खूप लाइक करते. ती सैफ अली खानचे खूप कौतुक करते.

जेव्हा हाच प्रश्न अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला विचारण्यात आला तेव्हा त्याने उत्तर दिले की, तो करिना कपूर खानचा मुलगा तैमूर अली खानला किड्नॅप करेल. यानंतर अनेक मनोरंजक प्रश्न कपिलने त्यांना विचारले.

चित्रपटांबद्दल बोलायचे म्हणले तर या दोघांचा चित्रपट २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत सिंह यांनी केले आहे. चित्रपटामध्ये परिणिती चोप्रा आणि सिद्धार्थे मल्होत्रा व्यतिरिक्त अभिनेता अपारशक्ती खुराना, जावेद जाफरी, संजय मिश्रा आणि शीबा चड्ढा मुख्य भूमिका साकारणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like