Shona Shona : रिलीज होताच टॉप ट्रेंडमध्ये आहे ‘शहनाज गिल-सिद्धार्थ शुक्ला’चं नवं गाणं !

पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विनर सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आणि बिग बॉस 13 ची एक्स स्पर्धक शहनाज गिल (Shehnaaz Kaur Gill) यांचे चाहते ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहात होते तो क्षण आला आहे. त्यांची प्रतीक्षा संपली आहे. सिद्धार्थ आणि शहनाज या जोडीचं नवं गाणं आता रिलीज झालं आहे. या गाण्यात या फेमस जोडीची केमिस्ट्री दिसत आहे.

टोनी कक्कर (Tony Kakkar) आणि नेहा कक्कर (Neha Kakkar) च्या या गाण्यात शहनाज आणि सिद्धार्थ यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. शोना शोना (Shona Shona) असं या गाण्याचं नाव आहे. बिग बॉसनंतर आता शहनाजनं तिचं वजन कमी केलं आहे. गाण्यात दिसत आहे की, सिद्धार्थ शहनाजची स्तुती करत तिच्या मागे मागे फिरत आहे. शहनाजदेखील तिच्या अंदांचा जादू दाखवताना दिसत आहे.

चाहत्यांना पुन्हा एकदा एका गाण्यात सिद्धार्थ-शहनाज एकत्र दिसत आहेत. नेहा कक्कर आणि टोनी कक्कर या भाऊ-बहिणीच्या जोडीनं हे गाणं गायलं आहे. रिलीज होताच हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सध्या हे गाणं टॉप ट्रेंडमध्ये आहे.

गाणं रिलीज होऊन एकच दिवस झालं आहे. अवघ्या काही तासांत या व्हिडिओला 4 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या गाण्याचा व्हिडिओ शेअरदेखील केला आहे. खूप लोकांना जोडीची केमेस्ट्री आवडल्याचं दिसत आहे.

You might also like