काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ माजी मंत्र्याचे महिलेशी गैरवर्तन; व्हीडिओ व्हायरल

बंगळुरु : वृत्तसंस्था – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात सापडत असतात. सिद्धरामय्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सिद्धरामय्या यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सिद्धरामय्या यांनी एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा, तसंच जाहीर धमकावल्याचा आरोप आहे. याप्रकरणाचा हा व्हिडीओ आहे.

जमीला असं या महिलेचं नाव आहे. म्हैसूरमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे जमीला तक्रार घेऊन गेली होती. जमीला या सिद्धरामय्यांच्या आमदार पुत्राची तक्रार करण्यासाठी आल्या होत्या. मात्र जमीला यांनी बोलायला सुरुवात करताच सिद्धरामय्या भडकले आणि त्यांनी महिलेच्या हातातून माईक हिसकावून घेतला. मात्र माईक काढून घेताना महिलेच्या साडीचा पदरही खाली घसरला. तो त्या महिलेने तातडीने सावरला. मात्र जमीला आपल्या तक्रारीचा पाढा वाचत होत्या. तेव्हा सिद्धरामय्यांनी तिच्या खांद्याला पकडून, ओरडून खाली बसवलं, असा हा प्रकार व्हीडिओमध्ये दिसत आहे. ही घटना घडली तेव्हा तेथील मिडिया कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली. मात्र आता या व्हीडिओवरून भाजप काँग्रेसवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, भाजपने काँग्रेस वरिष्ठांकडे सिद्धरामय्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणीही भाजपने केली आहे. या बहाण्याने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी आणि अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही भाजपने टीकास्त्र सोडलं.

राष्ट्रवादीला धक्का : ‘या’ माजी मंत्र्याचा भाजपात प्रवेश
तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीमाना देईल