#पुन्हानिवडणूक ? चा ‘धुरळा’, मराठी कलाकारांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात भाजप सेना यांच्यात मुख्यमंत्री पदावरून जे काही नाट्य झालं ते सर्वांनी पहिले त्यानंतर मात्र शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला मात्र अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. त्यानंतर मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी #पुन्हानिवडणूक? हा हॅशटॅग टाकून टाकला होता. मात्र हा हॅशटॅग कलाकारांना चांगलाच महागात पडल्याचे समजते.

कलाकारांनी हा हॅशटॅग सुरु केल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना प्रतिउत्तर देखील दिले. यानंतर याचे स्पष्टीकरण अनेक कलाकारांकडून देण्यात आले आहे. आमची कोणाचीही दिशाभूल करण्याचा हेतू नव्हता असे कलाकारांचे म्हणणे आहे. आमची पोस्ट ही कोणत्याही युती, आघाडी किंवा राजकीय पक्षाचं प्रमोशन किंवा खंडन करण्यासाठी नाही. हाच निवडणुकीचा धुराळा आपलं आयुष्य कसं बदलतो याचा अनुभव आपण घेतो आहोतच. असंच काहीसं आमच्याही बाबतीत झालंय, म्हणून आपल्यासोबत ते शेअर केलं. त्यामागची आमची भूमिका लवकरच कळेल आणि आशा आहे आपल्याला आवडेल सुद्धा.’सई ताम्हणकर, सिद्धार्ध जाधव यांनी ही पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे.

सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अंकुश जाधव, सोनाली कुलकर्णी अशा अनेक कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावर #पुन्हानिवडणूक? हा हॅशटॅग वापरला होता. त्यामुळे एक साथ एवढे कलाकार हा हॅशटॅग कशासाठी वापरात आहेत असा प्रश्न सगळ्यांना पडला होता मात्र कोणत्याही राजकीय परिस्थितीसाठी हा हॅशटॅग वापरला नसून केवळ आगामी ‘धुरळा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वापरला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like