Sidhu Moose Wala Murder Case | सिद्धु मुसेवाला हत्याकांड प्रकरणातील संशयित शॉर्प शूटर संतोष जाधवला साथीदारासह गुजरातमधून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sidhu Moose Wala Murder Case | पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडमधील संशयित शॉर्प शूटर संतोष जाधव (Santosh Jadhav) व त्याच्या साथीदाराला पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) गुजरातमधून (Gujarat) रविवारी अटक (Arrest) केली. त्याला रात्री उशिरा पुण्यात आणण्यात आले असून त्यांना न्यायालयासमोर (Court) हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी २० जूनपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) मंजूर केली आहे. अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांना धमकी प्रकरणातील मुंबई पोलीस (Mumbai Police) त्याची चौकशी करण्याची शक्यता आहे. (Sidhu Moose Wala Murder Case)

 

संतोष जाधव याने मंचर (Manchar In Pune) येथे राण्या बालखेले (Ranya Balkhele) याचा गोळ्या घालून खून (Murder) केल्यानंतर तो फरार झाला होता. ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मोक्का कारवाई केली होती. त्याचा शोध सुरु असतानाच गेल्या सोमवारी पंजाब पोलिसांनी संतोष जाधव व सौरी महाकाल (Sauri Mahakal) यांची सिद्धू मुसेवाला हत्याकाडांमधील (Sidhu Musewala Murder Case) संशयित म्हणून छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. त्यानंतर या दोघांचा शोध ४ राज्यात घेण्यात येत होता. सौरभ महाकाल याला ८ जून रोजी संनमनेरजवळून ग्रामीण पोलिसांनी पकडले होते.

जाधव हा गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर पुणे ग्रामीण पोलीस दलाचे एक पथक तातडीने तिकडे गेले. संतोष जाधव व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी पकडून पुण्यात आणले.

 

मुसेवाला हत्याकांड प्रकरणात (Sidhu Moose Wala Murder Case) एकूण ८ शॉर्प शूटर सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
त्यातील दोघे पुण्यातील असल्याचे पंजाब पोलिसांनी जाहीर केले होते.
राण्या बाणखेले याचा खून केल्यानंतर संतोष हा लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीमध्ये (Lawrence Bishnoi Gang) सहभागी झाला.
त्याच्यावर या वर्षी राजस्थानमध्ये खूनाचा प्रयत्न (Attempted To Murder) केल्याचा गुन्हा दाखल होता.
त्या प्रकरणातही राजस्थान पोलीस (Rajasthan Police) त्याचा शोध घेत होते.

 

Web Title :- Sharpshooter Santosh Jadhav arrested in Gujarat along with his accomplice by pune rural police Sidhu Moose Wala Murder Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा