Sidhu Moosewala Murder Case | पंजाब पोलिसांनी एन्काउंटर केलेल्या शार्प शूटरची माहिती संतोष जाधवला होती, पुणे ग्रामीण पोलिसांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sidhu Moosewala Murder Case | पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला हत्याकांडातील दोन शार्प शूटरांचा पंजाब पोलिसांनी (Punjab Police) एन्काउंटर (Encounter) केला. पोलिसांनी अटारी सीमेवर दोघांचा खात्मा केला. या दोन शार्प शूटरांची (Sharp Shooter) माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) अटक (Arrest) केलेल्या संतोष जाधवला (Santosh Jadhav) होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने याची माहिती सांगितली होती, असे पुणे ग्रामीण पोलिसांनी (Sidhu Moosewala Murder Case) सांगितले आहे.

 

अटारी सीमेवर पंजाब पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत बुधवारी जगरुप उर्फ रुपा (Jagarup alias Rupa) आणि नमप्रीत उर्फ मन्नू (Nampreet alias Mannu) हे ठार झाले. मन्नू यानेच सिद्धु मुसेवाला याच्यावर AK 47 मधून गोळ्या घातल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले होते. मुसेवाला याची हत्या झाल्यानंतर 52 दिवस ते फरार होते. पुणे जिल्ह्यातील संतोष जाधव आणि महाकाल (Mahakal) यांची नावे शार्प शूटर म्हणून पंजाब पोलिसांनी जाहीर केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

 

पुणे ग्रामीण पोलिसांनी महाकाल याला पुणे जिल्ह्याच्या सीमेवर तर संतोष जाधव याला गुजरातमधून अटक केली होती. त्यांच्याकडे पुणे ग्रामीण पोलीस, पंजाब पोलीस यांनी कसून चौकशी केली होती. संतोष जाधव याच्यावर मंचर येथील खून तसेच नारायणगाव येथील खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहे. याशिवाय मंचर येथे खंडणीचा (Extortion) गुन्हा दाखल आहे. त्यात सध्या तो मंचर पोलिसांच्या (Manchar Police) ताब्यात आहे.

संतोष जाधव याच्याकडे 4 ते 5 दिवस पंजाब पोलिसांनी कसून चौकशी केली होती. चौकशीमध्ये त्याने मन्नू याला ओळखत असल्याचे सांगितले होते.
मुसेवाला हत्याकांडात (Sidhu Moosewala Murder Case) एकूण 8 शार्प शूटरचा वापर करण्यात आला होता.
यातील प्रत्येकाला तीन लाख रुपये मिळाले होते. संतोष जाधव याला ज्याने आश्रय दिला होता.
त्याच्या सांगण्यावरुन संतोषला पैसे मिळाल्याचे उघड झाले होते.
पंजाब पोलिसांनी जाधव याच्याकडे मुसेवाला हत्याकांडाची चौकशी केल्याने पुणे पोलिसांनी या
प्रकरणात अधिक चौकशी केली नाही. परंतु त्याने मन्नू विषयी माहिती दिली होती.
तसेच इतर शार्प शूटरचीही त्याला माहिती होती, असे तपासात पुढे आले आहे.

 

Web Title :- Sidhu Moosewala Murder Case | santosh jadhav was aware of that
sharp shooter in moosewala massacre pune rural police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा