Sidhu Moosewala Murder Case | मूसेवालाची हत्या झाली तेव्हा मी गुजरातमध्ये होतो, संतोष जाधवच्या खुलाशाने प्रकरणाला वेगळं वळण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणामध्ये (Sidhu Moosewala Murder Case) मोठी घडामोड समोर आली आहे. मूसेवाला हत्या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचं चौकशीत संतोष जाधव (Santosh Jadhav) याने म्हटले आहे. त्यामुळे तपास यंत्रणेसाठी हा मोठा झटका आहे. गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala Murder Case) याच्यावर हल्ला करण्याकरता सचिन बिश्नोई गँगने (Sachin Bishnoi Gang) महाराष्ट्रातून दोन शार्प शूटर बोलावले होते. त्यातील एक आरोपी संतोष जाधव होता. मात्र, संतोषच्या माहितीमुळे आता तपासाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

 

संतोष जाधवने पोलिसांना सांगितलं की, सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येत (Sidhu Moosewala Murder Case) मी सहभागी नाही, मला फसवलं जात आहे. मूसेवाला यांची हत्या झाली तेव्हा मी गुजरातमधील मुद्रा बंदराजवळ (Mudra Port in Gujarat) एका हॉटेलमध्ये होतो. सिद्धू मूसेवाला हत्याकांडात संतोष जाधवची भूमिका काय होती, याचा तपास करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) पथकाकडून सध्या मध्य प्रदेश आणि गुजरात मध्ये तपास सुरु आहे.

 

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) उच्च अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधव याला अटक केल्यानंतर त्याने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येतील सहभाग स्पष्टपणे नाकारला आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या वेळी तो पंजाबमध्ये नव्हता, असं त्याचं म्हणण आहे. आपल्याला नाहक बळीचा बकरा बनवलं जात असल्याचे त्याने म्हटलं आहे.

 

दरम्यान यापूर्वी महाकाल उर्फ सौरभ उर्फ सिद्धेश कांबळे (Mahakal alias Saurabh alias Siddhesh Kamble) याने मूसेवाला हत्या प्रकरणात सहभागी नसल्याचे सांगितले होते. तर दिल्ली (Delhi Police) आणि पंजाब पोलिसांनी (Punjab police) 8 शूटर्सचे फोटो जारी केले होते आणि दावा केला होता की संतोष जाधव हा या हत्याकांडाचा मुख्य शूटर होता. त्यामुळे आता चौकशीत काय माहिती समोर येते हे पहावे लागले. संतोष जाधव याच्या अटकेमुळे मूसेवाला प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता याला वेगळचं वळण लागलं आहे.

 

कोण आहे संतोष जाधव ?

संतोष जाधव हा 23 वर्षाचा असून तो मूळचा आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon Taluka) आदिवासी भागातील पोखरी गावचा आहे.
त्याचे मंचरमध्ये वास्तव्य होते. त्याच्या कुटुंबात आई, बहीण पत्नी एक मुलगी आहे.
मंचर पोलीस ठाण्याच्या (Manchar Police Station) हद्दीत राणा उर्फ ओंकार बाणखेले (Rana alias Omkar Bankhele) याचा 1 ऑगस्ट 2021 रोजी खून (Murder) करण्यात आला होता.
या गुन्ह्यात संतोष जाधव याचा सहभाग असल्याचा गुन्हा (FIR) दाखल आहे.
तसेच त्याच्यावर खंडणी (Ransom) आणि चोरीचा (Theft) गुन्हा देखील दाखल आहे.

राण्या बाणखेले खुनाच्या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का (MCOCA Action) Mokka लावण्यात आला असून तो फरार होता.
या प्रकरणात त्याला तडीपार करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे राजस्थान, पंजाब, हरियाणा भागात वास्तव्य होते.
तेथेही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

 

 

Web Title :- Sidhu Moosewala Murder Case | sidhu moosewala murder case big revelation from santosh jadhav pune rural gramin police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा