पिंपरी : महापालिका इमारतीला घेराव, महापौर आणि आयुक्तांसह सर्व अडकले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची काढलेली निविदा रद्द करावी या मागणीसाठी विरोधकांसह सफाई कामगारांनी महापालिकेच्या इमारतीला घेराव घालत आंदोलन केले. यामुळे महापौर, आयुक्तांसह पदाधिकारी महापालिकेत अडकले होते.

या आंदोलतानात राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने, शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, संदीपान झोंबाडे, प्रल्हाद कांबळे यांच्यासह मोठया संख्येने कामगार सहभागी झाले होते.

महापालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या अंतर्गत रस्त्यांची तसेच मुंबई – पुणे महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येणार आहे. 1 हजार 670 किलोमीटर लांबीच्या रस्ते साफसफाई कामासाठी सहा विविध ‘पॅकेजेस’ मध्ये विभागणी करत 7 वर्ष कालावधीसाठी 647 कोटी रुपयांची निविदा काढली आहे. ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेऊन नियम, अटी-शर्ती बनविण्याल्याचा आरोप होत आहे. या निविदेमुळे 1100 कामगार बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे ही निविदा रद्द करण्याची मागणी केली जात आहे.

यासाठी आज संध्याकाळी आंदोलन करण्यात आले. महापालिका इमारतीच्या इन-आउट गेट बंद केल्याने पालिकेत असणाऱ्यांना अडकून पडावे लागले. पावणे आठच्या सुमारास आयुक्तांनी निवेदन स्विकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like