Sierra Leone Blast | तेलाच्या टँकरमध्ये स्फोट ! 92 लोकांचा होरपळून मृत्यू, 100 हॉस्पिटलमध्ये दाखल (व्हिडीओ)

फ्रिटाऊन : वृत्तसंस्था  –  Sierra Leone Blast | अफ्रीकन देश सिएरा लियोनच्या राजधानीत भीषण दुर्घटना घडली. येथे बसने टँकरला धडक दिली. अपघातात तेलाच्या टँकरचा स्फोट (Sierra Leone Blast) झाला आणि 92 लोकांचा मृत्यू झाला तर 100 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी शनिवारी ही माहिती दिली.

 

फ्रिटाऊनच्या पूर्व भागातील उपनगर वेलिंग्टनमध्ये एका बसने टँकरला धडक दिल्यानंतर शुक्रवार रात्री उशीरा हा स्फोट झाला.
स्टाफ सदस्य फोदे मूसा यांच्यानुसार, कॅनॉट हॉस्पिटलच्या शवागरात शनिवारी सकाळपर्यंत 92 मृतदेह आणल्याची माहिती आहे. गंभीर भाजलेल्या 30 जखमींची प्रकृती नाजूक आहे.

 

जखमी लोक ज्यांचे कपडे स्फोटानंतर लागलेल्या आगीत जळाले होते, ते स्ट्रेचरवर नग्नावस्थेत पडले होते.
स्फोटानंतर ‘असोसिएटेड प्रेस’ द्वारे मिळालेल्या व्हिडिओमध्ये रात्री आगीच्या भीषण ज्वाळा धगधगताना दिसत आहेत, गंभीर भाजलेले लोक विव्हळताना दिसत आहेत.

 

 

दरम्यान राष्ट्रपती जूलियस माडा बायो, जे शनिवारी संयुक्त राष्ट्राच्या जलवायु वार्तामध्ये भाग घेण्यासाठी स्कॉटलंडमध्ये आले होते.
त्यांनी दुर्घटनेनंतर दुख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट केले की, ज्या कुटुंबांनी आपल्या माणसांना गमावले आहे आणि जखमी झाले आहेत त्यांच्याबाबत सहानुभूती आहे.

 

उपराष्ट्रपती मोहम्मद जुल्देह जलोह यांनी रात्रभर दोन हॉस्पिटलचा दौरा केला आणि म्हटले की,
सिएरा लियोनची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन एजन्सी आणि इतर आपत्कालीन व्यवस्था अथक प्रयत्न करत आहेत.
आम्ही सर्व या राष्ट्रीय आपत्तीमुळे खुप दुखी आहोत.
आमच्या देशासाठी हा कठिण काळ आहे.

 

Web Title : Sierra Leone Blast | sierra leone blast fuel tanker blast claims 92 lives another 100 rushed to hospitals watch video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Aryan Khan Drugs Case | ‘सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, तोच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड’ – भाजपचे मोहित कंबोज

Lunar Eclipse 2021 | काही दिवसातच होणार शतकातील ‘दिर्घ’ चंद्रग्रहण, भारतातील ‘या’ भागातून दिसणार

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालयात ‘पीएम केअर फंडा’मधील व्हेंटिलेटरमुळे आग भडकली? आमदार रोहित पवारांना संशय