Signal App डाऊन, जगभरातील युझर्सना फटका, सेवा पूर्ववतचे काम सुरु

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  WhatsApp च्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर जगभरातील युझर्सनी नाराजी व्यक्त करत आपला मोर्चा Signal app कडे वळवले आहेत. मात्र, अल्पावधीतच Signal app मोठ्या प्रमाणावर डाऊनलोड झाल्याचा फटका युझर्सना बसला. Signal app काही वेळातच डाऊन झाले मात्र app वापरण्यात अडचणी येत असल्याची तक्रार अनेकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान Signal app डाऊन झाल्याचा कंपनीकडून अधिकृतरित्या दुजोरा देण्यात आला. कंपनीच्या अपेक्षेपेक्षा अधिक युझर्स वाढल्याने काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे, असेही सिग्नल अ‍ॅपकडून सांगण्यात आले.

Signal app मध्ये काही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. त्या दूर करून शक्य तितक्या लवकर सेवा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे, असे कंपनीने सांगितले आहे. एका दिवसांत हजारो नवीन युझर्स आले आहेत. नवीन सर्वर्स आणि अधिक क्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर नाराज होत अनेकजण सिग्नल आणि टेलिग्राम अ‍ॅपला पसंती दिली आहे. गेल्या काही दिवसांत अडीच कोटींहून अधिक टेलिग्राम अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले. यातील सर्वांत जास्त 98 टक्के युझर्स आशियातील होते, अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान WhatsApp ने नवीन प्रायव्हसी पॉलिसी पुढील तीन महिन्यांसाठी लांबवणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप युझर्सना दिलासा मिळाला आहे. आता, 8 फेब्रुवारीला कोणत्याही युझरचे अकाऊंट बंद होणार नाही. चौफेर होणारी टीका आणि विरोधानंतर व्हॉट्सअ‍ॅपने आता एक पाऊल मागे घेत नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.