कम्प्युटरवर वापरता येते का Signal ? येथे जाणून घ्या संबंधीत प्रश्नांची सर्व उत्तरं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिग्नल एक पॉप्युलर मॅसेजिंग अ‍ॅप आहे, येथे तुम्ही मॅसेजेस, इमेजेस, व्हॉईस नोट्स, व्हिडिओज, आणि फाईल्स एंड- टू- एंड एनक्रिप्शनसह शेयर करू शकता. सिग्नल कम्प्युटरवर वापरता येते का, यासह असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेवूयात…

सिग्नल पीसीवर चालू शकते ?
सिग्नल डेस्कटॉप अ‍ॅप तुम्ही तुमच्या मोबाईलसोबत लिंक करू शकता. तसेच पीसीवर सुद्धा मॅसेजेस सेंड अँड रिसीव्ह करू शकता.

सिग्नल अ‍ॅप वेबमध्ये वापरू शकतो का?
सिग्नल अ‍ॅपचे वेब व्हर्जन नाही. हे अ‍ॅपचे मोबाइल व्हर्जन आणि डेस्कटॉप व्हर्जन यूज करू शकता, जे प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे.

सिग्नल अ‍ॅप डेस्कटॉपवर कसे काम करते ?
सिग्नल डेस्कटॉप क्रोम अ‍ॅप आहे जे स्मार्टफोनसोबत लिंक होते, ज्यामुळे तुम्ही डेस्कटॉपवरून मॅसेजेस पाठवू शकता आणि रिसिव्ह करू शकता.

सिग्नल व्हिडिओ कॉलसाठी सेफ आहे का ?
सिग्नल अ‍ॅप एक इंक्रिप्टेड मॅसेजिंग सर्व्हिस अ‍ॅप आहे जे मॅसेजेस, इमेजेस, ऑडियो आणि व्हिडिओसाठी सुरक्षित अ‍ॅप आहे. अ‍ॅप पीसी (लिनक्स, मॅक आणि विंडो), अँड्रॉईड आणि आयओएस डिव्हाईसवर अ‍ॅक्सेस केले जाऊ शकते.

सिग्नलवरून व्हिडिओ पाठवता येतात का ?
तुम्ही सिग्नलवरून सहजपणे व्हिडिओ, व्हॉईस नोट्स, पिक्चर्स आणि मोठ्या फाइल्स पाठवू शकता. चॅट सेक्शन उघडा त्याच्या सर्वात वर उजवीकडील एका पेपर आयकॉन वर क्लिक करा आणि सिलेक्ट करा, जे पाठवायचे आहे.

सिग्नल सर्व्हर मॅसेजेस स्टोअर्ड करते का ?
सिग्नल अ‍ॅपवर तुमच्याद्वारे पाठवण्यात आलेले मॅसेजेस तुमच्या स्मार्टफोनमध्ये स्टोअर्ड होतात. स्टोअर्ड मॅसेजेस अ‍ॅक्सेस करण्यासाठी डिव्हाईसवर चॅट बॅकअप करण्याची आवश्यकता असते.