SII & WHO : ‘सीरम’ला कोव्हॅक्सिन लसीची आठवण करुन देत WHO चा ‘इशारा’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून जगभरातील अनेक देशांकडून लसीचे उत्पादन सुरु आहे. अमेरिका आपली गरज भागवून आता जगातील इतर देशांसाठी कोरोना लसीचे दोन कोटी डोस देणार आहे. तर जगाची गरज भागवून स्वदेशाला नंतर लस देणाऱ्या सीरमला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक आठवण करुन दिली आहे.

भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक लोक संक्रमित होत आहेत. भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना 18 वर्षापुढील सर्वांना लस देण्यात येत आहे. दरम्यान देशात 18 ते 44 आणि त्यावरील वयोगटाला पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने लसीच्या मागणीचा पुरवठा करण्यास कंपन्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने सिरमला एकप्रकारे तंबी दिली आहे.

भारतात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात नागरिकांना लस मिळत नाही. अनेक राज्यांकडून लसीची मागणी होत आहे. मात्र त्यांना पुरेशी लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे भारतीय कंपन्या भारताला पुरेसी लस देऊ शकत नसताना जगभरात पुरवठा करण्यास सक्षम नाहीत. त्यातच WHO ने सीरमने लसीचा पुरवठा करायला हवा, अशी तंबी दिली आहे.

WHO ने काय म्हटले

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस अदनोम घेब्रेयियस यांनी म्हटले की, भारतात कोरोनाचा प्रकोप आहे. भारतातील कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर सीरमने जगाला लसीचा पुरवठा करायला पाहिजे. सीरमने त्यांची जगासाठीची प्रतिबद्धताही पाळायला पाहिजे. कोव्हॅक्स ही जगभरासाठी कोरोना व्हायरस लसीच्या पुरवठ्याची एक जागतिक उकल आहे. जगभरात कोरोनाचा प्रकोप वाढल्याने कोरोना लसीच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. कोव्हॅक्सकडे जूनच्या अखेरपर्यंत 19 कोटी लसींची कमतरता आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सीरमने आश्वासन पूर्ण केले पाहिजे

ट्रेड्रोस अदनोम घेब्रेयियस पुढे म्हणाले, कोव्हॅक्स म्हणजे जागतिक कोरोना लस समान पुरवठा योजना आहे. यानुसार 124 देशांना 6.5 कोटी लसी वाटण्यात आल्या आहेत. आता लस निर्मिती कंपन्यांनी आणखी लसी पुरवून ही कमतरता भरुन काढली पाहिजे. ते म्हणाले, एकदा का भारतातील कोरोनाचा प्रकोप कमी झाला की, सीरम इन्स्टिट्यूटने पून्हा ट्रॅकवर येणे गरजेचे आहे. याशिवाय सीरमने कोव्हॅक्सला लस देण्याचे आपले आश्वासन पूर्ण केले पाहिजे.

भारतातील कोरोनामुळे पुरवठा प्रभावित

संयुक्त राष्ट्रांच्या लहान मुलांच्या एजन्सीनेदेखील कोव्हॅक्सला होत असेला पुरवठा भारतातील कोरोना संकटामुळे प्रभावित झाल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, लसीकरण सुरु झाल्यानंतर भारतातील लस उत्पादक कंपनी सीरमने जगासाठी ही लस पुरवली होती. त्याचवेळी भारतीयांसाठी देखील ही लस पुरवली जात होती. मात्र, यावरुन केंद्र सरकारवर टीका होत आहे.