पाकिस्तानात शीख युवकाची हत्या, स्वतःच्या लग्नाच्या तयारीसाठी पेशावर येथे गेला होता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधील पेशावर येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका शीख तरुणाची एका अज्ञात व्यक्तीने हत्या केली असून चमकानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या तरुणाचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे भारतात एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाचे नाव रविंदर सिंग असून तो २५ वर्षाचा होता. रविंदर सिंग मलेशियाला राहत होता. पेशावर येथे शॉपिंगसाठी आला असतानाच त्याची हत्या करण्यात आली आहे.

दरम्यान पाकिस्तानात अशा घटनांमध्ये वाढ होत असून नुकतेच शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांचे जन्मस्थळ असलेल्या पाकिस्तानातील नानकाना साहिब गुरुद्वारावर हल्ला झाला आणि आता शीखधर्मीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानला आवाहन करण्यात येत आहे की, असे निर्घृण हत्या करण्याचं कृत्यं थांबवावं. असे कृत्य करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच पाकिस्तान मध्ये सध्या सर्रास माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत.

नानकाना साहिब येथील गुरुद्वारा श्री जनमस्थानच्या अलीकडील तुच्छतेने होणारी तोडफोड आणि अपमान, जबरदस्तीने धर्मांतर करून लग्न करणे, शीख मुलीचे अपहरण आणि आता शीख मुलाची हत्या असले निर्घृण प्रकार पाकिस्तानात घडत असून या घटनांवर कारवाई देखील होत नाही आणि याबाबत भारत तीव्र निषेध करतो, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नानकाना साहिब गुरुद्वारावर पाकिस्तानी नागरिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा पाकिस्तान आणि भारतातील शीख नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान पेशावरमध्ये या शीख तरुणाची निर्घृण हत्या केल्याने भारत – पाकिस्तान वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/