Sikkim Major Accident | सिक्किमध्ये खोल दरीत कार कोसळली, महाराष्ट्रातील पाच पर्यटकांसह 6 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sikkim Major Accident | नॉर्थ सिक्किमध्ये (North Sikkim) शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात सहा लोकांचा मृत्यू (Death) झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) पाच पर्यटकांचा (Tourists) समावेश असून कार चालकाचा देखील यामध्ये मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण (Sikkim Major Accident) होता की सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. महाराष्ट्रातील मृत्यू झालेले पाच पर्यटक हे ठाण्यातील (Thane) एकाच कुटुंबातील होते.

 

ठाण्यातील एकाच कुटुंबातील हे सदस्य फिरण्यासाठी गुरुवारी (दि.28) विमानाने सिक्किम येथे गेले होते. तेथे त्यांनी भाडेतत्त्वावर एक कार घेतली होती. मात्र, प्रवास करत असताना ही कार 500 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात (Sikkim Major Accident) कारमधील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. हे कुटुंब मागील 15 वर्षापासून ठाण्यात राहत होते.

 

सुरेश पन्नालालजी पुनमिया (Suresh Pannalalji Punmia), तोरल सुरेश पुनमिया (Toral Suresh Punmia), हिरल सुरेश पुनमिया (Hiral Suresh Punmia), देवांश सुरेश पुनमिया (Devansh Suresh Punmia), जयन अमिन परमार (Jayan Amin Parmar), चालक सोमी विश्वकर्माठे (Driver Somi Vishwakarmathe) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. सोमवारी (दि.30) अपघातात मृत्यू झालेल्या सर्वांचे मृतदेह ठाण्यात आणले जाणार आहेत.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील हे पर्यटक नॉर्थ सिक्किम येथून गंगटोक (Gangtok) येथे येत होते.
याच दरम्यान कार तब्बल 500 फूट खोल दरीमध्ये (valley) कोसळली.
या अपघातात कार चालकाचा देखील मृत्यू झाला असून मृतांमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
हा अपघात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला.

 

Web Title :- Sikkim Major Accident | major accident of thane Suresh Punmia family in sikkim six dead

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा