सिल्लोड मतदारसंघात अब्दुल सत्तार यांनी राखली शिवसेनेचीअब्रु, अपक्ष प्रभाकर पलोडकर यांचा धोबीपछाड

सिल्लोड (औरंगाबाद) : पोलीसनामा ऑनलाइन – सिल्लोड मतदारसंघात नुकतेच शिवसेनेत प्रवेश करणारे अब्दुल सत्तार यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर पलोडकर मोठ्या मताधिक्यांनी मागे टाकले. सिल्लोडमध्ये शिवसेनेने अब्दुल सत्तार यांच्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. या मतदारसंघात विधानसभा निवडणूकीत 73 टक्के मतदान झाले होते. मागील निवडणूकीत काँग्रेसकडून विजयी झालेले अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एका विजय मिळवला आहे. फरक एवढाच आहे की त्यांनी हा विजय शिवसेनेकडून मिळवला आहे. अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते.

दुपारी 1.05 वाजता अब्दुल सत्तार यांनी 73 हजार 509 मते मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार कैसर आझाद शेख यांना फक्त 1755 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार प्रभाकर पलोडकर कडवी झुंज दिली. त्यांना 61,485 मते मिळाली होती. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यापासूनच अब्दुल्ल सत्तार आघाडीवर होते.

राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांनी 96 हजार 038 एवढी मते मिळवत विजय मिळवला होता. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे सुरेश बनकर होते. त्यांना 82 हजार 117 मते मिळाली होती, त्यांचा 13 हजार 921 मतांनी पराभव झाला होता. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर शिवसेना चे सुनील मिरकर, चौथ्या स्थानावर मनसेचे दिपाली काळे आणि पाचव्या क्रमांकावर NOTA चे नोटा होते.

Visit : Policenama.com