गतवर्षी सोन्याच्या मागणीत 35 टक्क्यांहून अधिक घट, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज राजधानी दिल्लीत सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण नोंदली गेली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, स्थानिक बाजारात सोन्याच्या किंमतीत 109 रुपयांची घसरण झाली आणि ती 48,183 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. सोने मागील व्यवहाराच्या दिवसात 48,292 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

चांदीच्या किंमतीत सुद्धा घसरण
चांदीबाबत बोलायचे तर, मागील व्यवहाराच्या सत्राच्या 65,177 रुपये प्रति किलोग्रॅमच्या तुलनेत आज चांदीचा भाव 146 रुपयांनी घसरून 65,031 रुपये प्रति किलोग्रॅम झाला. अंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी क्रमश: 1,840.79 अमेरिकन डॉलर प्रति औंस, 25.12 अमेरिकी डॉलर प्रति औंसच्या स्तरावर होते.

यामुळे झाली घसरण
याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, मजबूत अमेरिकन डॉलर आणि कमजोर न्यूयॉर्कयेथील कमोडिटी बॉरो (कॉमॅक्स) ने दिल्लीमध्ये 24 कॅरेटसाठी सोन्याच्या किमतीमध्ये 109 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट आली.

मागील वर्षी 35 टक्क्यांपेक्षा जास्त घटली सोन्याची मागणी
देशाची सोन्याची मागणी मागील वर्षी म्हणजे 2020 मध्ये 35 टक्क्यांपेक्षा जास्त घटून 446.4 टनवर आली. जागतिक सुवर्ण परिषद (डब्ल्यूजीसी) च्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. डब्ल्यूजीसीच्या 2020 मधील सोन्याच्या मागणीवरील रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोरोना व्हायरसमुळे लागू लॉकडाऊन आणि बहुमूल्य धातुंचे दर आपल्या सर्वकालिन उच्चस्तरावर पोहचलेले असताना सोन्याच्या मागणीत घसरण झाली. मात्र, यासोबतच रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आता स्थिती सामान्य होत आहे आणि सोबतच सुधारणांमुळे उद्योग मजबूत झाला आहे. यामुळे यावर्षी 2021 मध्ये सोन्याच्या मागणीत सुधारणेची अपेक्षा आहे.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोरोनामुळे 2020 मध्ये भारताची सोन्याची मागणी 35.34 टक्के घसरून 446.4 टनवर आली, जी 2019 मध्ये 690.4 टन होती. 2020 मध्ये दागिन्यांची एकुण मागणी कोरोनामुळे 42 टक्के घसरून 315.9 टन राहिली, जी 2019 मध्ये 544.6 टन होती.