Silver Oak Attack Case | ‘त्यांना’ ‘सिल्व्हर ओक’वरील हल्ल्याची माहिती होती’; भाजपचा खळबळजनक आरोप !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Silver Oak Attack Case | एसटी संपामधील एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’ (Silver Oak Attack Case) वर हल्ला केला होता.
यावरून आता राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना पोलीस कोठडी (Police Custody) झाली आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Home Minister Dilip Walse – Patil) यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मात्र अशातच भाजप महाराष्ट्रने (Maharashtra BJP) मोठा गौप्यस्फोट केला आहे.

 

ज्या विश्वास नांगरे – पाटील (IPS Vishwas Nangre – Patil) यांना घटनेपूर्वी माहिती मिळूनही ते महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सर्वोच्च नेत्याला सुरक्षा पुरवत नाहीत आणि तरीही तुम्ही त्यांनाच चौकशी प्रमुख नेमता.
जब सैय्या भए कोतवाल, तो डर काहे का ?, असा टोला महाराष्ट्र भाजपने लगावला आहे.

 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलजी कशाला सिल्वर ओक आंदोलनाच्या चौकशीचा फार्स करताय ?,
असा सवालही भाजपने राज्याच्या गृहमंत्र्यांना केला आहे.
याबाबत महाराष्ट्र भाजपने ट्विट केलं आहे. यामध्ये आंदोलनाचा इशारा देणारं पत्र भाजपने शेअर केलं आहे. (Silver Oak Attack Case)

 

दरम्यान, भाजपने पोस्ट केलेल्या पत्रामध्ये चार एप्रिल रोजी हे पत्र गुन्हे अन्वेषण विभागाचे Criminal Investigation Department (CID) अपर पोलीस आयुक्त निशीथ मिश्र यांनी मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस सह आयुक्तांना पाठवलं होतं.
त्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी 4 एप्रिल रोजी मंत्रालय आणि 5 एप्रिल रोजी सिल्वर ओक तसेच मातोश्री बंगला या ठिकाणी आंदोलनाचा धमकीवजा इशारा दिलाय.
त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं या पत्रात म्हटलं आहे.

 

Web Title :- Silver Oak Attack Case | bjp slams shivsena dilip walse patil over attack on sharad pawar home oppose appointment of ips vishwas nangare patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा