चांदी चकाकली, सोन्याच्या किंमतही वाढली, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्थानिक वायदा बाजारात चांदीने आज मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचे पहायला मिळाले. MCX एक्सचेंवर सकाळी नऊ वाजता 14 सप्टेंबरच्या चांदीचा दर 55423 रुपये प्रति किलोग्रॅम झाला होता.चांदीच्या दरात 1418 रुपयांची वाढ झाली.

चांदीसोबत सोन्याच्या वायदा बाजारातही वाढ नोंदवण्यात आली. एमसीएक्सवर 5 ऑगस्ट 2020 साठी सोन्याच्या किंमतीमध्ये 73 रुपयांची वाढ झाली. तर सोन्याचे दर 5 ऑक्टोबरसाठी 49235 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. यावेळी सोन्याच्या दरात 77 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.

कॅमेक्सवर सोन्याचा भाव मंगळवारी सकाळी 0.16 टक्के म्हणजे 2.9 डॉलरनी वाढला होता. सोन्याचा दर 1820.30 डॉलर प्रति औस झाला होता. एवढेच नाही तर जागतिक बाजारात 0.93 डॉलरच्या वाढीसह सोने 1818.70 डॉलर प्रति औस झाले होते. चांदीच्या जागतिक वायदा किंमतीमध्ये मोठी वाढ झाली. कॉमेक्सवर चांदीच्या किंमतीत 0.49 डॉलरची वाढ झाली. आज चांदी 20.70 डॉलर प्रति औसवर व्यापार करत होती.

अँजेल ब्रोकिंगच्या अनुज गुप्ता यांनी सांगितले की, सोन्याची किंमत पुढील एक-दोन महिन्यात 51000 च्या आसपास जाईल. तर मोतिलाल ओस्वालच्या किशोर नर्ने यांनी म्हटले की, पुढील दोन वर्षात सोन्याच्या किंमती 65 ते 68 हजारावर जाण्याची शक्यता आहे. एवढी मोठी वाढ ही भारतीय रुपया आणि डॉलरच्या किंमतीवर अवलंबून असल्याचे ते म्हणाले.