SIM Card Portability | तुमचा मोबाइल नंबर फक्त 1 रुपयांत घरबसल्या पोर्ट करता येणार; जाणून घ्या नवा नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SIM Card Portability | आताच्या काळातील सर्वात आवश्यक वस्तु हे मोबाईल झालं आहे. सरकारने मोबाइल नंबर, टेलिफोन कनेक्शनशी संबंधित काही नियमांत बदल केले आहेत. आता कोणताही नवा मोबाइल नंबर (SIM Card Portability ) घेण्यासाठी केवायसी (KYC) पूर्णपणे डिजीटलरित्या असणार आहे. केवायसीसाठी कोणताही फॉर्म जमा करावा लागणार नाही. पोस्टपेड, प्रीपेड, सिम कार्ड पोर्ट करण्यासाठीही आता फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

नकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षेतेखालील कॅबिनेट बैठकीमध्ये याबाबत मंजुरी देण्यात आली आहे. या बदलत्या नियमांप्रमाणे Self केवायसी ची परवानगीत आता हे केवायसी App आधारे होईल. या ई-केवायसी साठी फक्त 1 रुपये चार्ज द्यावा लागणार आहे. तर, केवायसी साठी टेलिकॉम कंपन्या ग्राहकांकडे काही कागदपत्रे मागतात, तेव्हा ग्राहकांचा हेलपाटा होतो. आता (SIM Card Portability) नव्या नियमानुसार घरबसल्या स्वत: सेल्फ केवायसी (Self KYC) करता येणार आहे. त्यासाठी कंपनीच्या वेबसाइट किंवा App वर डॉक्युमेंट्स अपलोड करणे आवश्यक आहे.

दरम्यान, प्रीपेड ते पोस्टपेड (Prepaid to postpaid) आणि पोस्टपेड ते प्रीपेड करण्यासाठी प्रत्येकवेळी केवायसी प्रोसेस करावी लागते.
मात्र, हे काम आता 1 रुपयांत आणि ते देखील डिजीटल माध्यमातून असणार आहे.
या नव्या नियमांमुळे ग्राहकाचे काम सोपं झालं आहे.

Web Titel :- SIM Card Portability | new rule regarding sim card kyc now you can port your number at home for 1 rs check here to know details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anti Corruption | 20 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Girlfriend On Rent | इथं भाड्याने मिळतात ‘गर्लफ्रेन्ड’, तुम्ही सुद्धा करू शकता ‘हायर’ !

Ajit Pawar | नगरपरीषदेच्या इमारतीवरील अक्षरांचा रंग गेल्याचे पाहून अजित पवार संतापले; अवघ्या 2 तासात ‘चेंज’