‘इंटरनेट’ आणि ‘कॉल्स’ व्यतिरिक्त कंपन्या ग्राहकांना देतात ‘या’ सुविधा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सीमकार्ड कंपन्यांद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स दिल्या जातात. सध्या कोणत्या कंपनीमध्ये काय ऑफर्स दिल्या जात आहे. याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्याचबरोबर वोडाफोन, एयरटेल आणि रिलायन्स जिओ या कंपन्या ग्राहकांना इंटरनेट आणि कॉल्स व्यतिरिक्त काय काय सुविधा देतात याचीही माहिती देणार आहोत.

३०० रुपयांपर्यतच्या प्लॅनमध्ये ग्राहकाला पुढील गोष्टी मिळतात –

वोडाफोनचा २५५ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

वोडाफोनच्या या प्लॅन मध्ये नुकताच बदल करण्यात आला होता, आता या प्लॅन मध्ये रोज २.५ जी.बी ३ जी /४ जी डेटा मिळत आहे. याची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. डेटा व्यतिरिक्त प्रीपेड प्लॅन मध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल, एस टी डी आणि राष्ट्रीय कॉल्स सुद्धा दिलेले आहेत. तसेच या प्लॅन मध्ये रोज १०० एस एम एस सुद्धा दिले गेलेले आहेत. २५५ रुपयांच्या या प्लॅन मध्ये ग्राहकांना लाइव्ह टीव्ही, सिनेमा आणि कंपनीच्या वोडाफोन प्ले अँपची सुद्धा मुभा देण्यात आली आहे.

रिलायन्स जिओचा २९९ रुपए किमतीचा प्लॅन

वाढत्या ग्राहकांमुळे रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. २९९ रुपयांच्या प्लॅन मध्ये जिओ ग्राहकांना रोज ३ जी.बी डेटा इंटरनेट देत आहे आणि या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. इंटरनेट व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, एस टी डी आणि रोमिंग कॉल्स आणि रोज १०० एस एम एस सुद्धा देण्यात आले आहेत. याबरोबरच ग्राहकांना जिओ सिनेमा आणि न्यूज सुद्धा मोफत पाहण्याची मुभा मिळते.

एयरटेलचा २९९ रुपयांचा प्लॅन

२८ दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज २.५ जीबी डेटा मिळतो तसेच एस टी डी आणि नॅशनल रोमिंग कॉल्सचे लाभही या प्लॅनमध्ये ग्राहकाला मिळतात. डेटा आणि कॉलिंग व्यतिरिक्त ग्राहकाला रोज १०० एस एम एसही या प्लॅनमध्ये मिळतात.

एअरटेल ग्राहकांसाठी फायदेशीर गोष्ट ही आहे की, या सर्व गोष्टींच्या व्यतिरिक्त ग्राहकांना ऐमेझॉन प्राईम मेंबरशीप, एअरटेल टी व्ही प्रीमियर, विंक म्यूजिक सब्सक्रिप्शन, १ वर्षांसाठी नॉर्टन मोबाईल सब्सक्रिप्शन आणि नवीन ४ जी फोन घेतला तर २००० रुपयांपर्यतचा कॅशबॅक सुद्धा मिळत आहे.

आरोग्यविषयक वृत्त