‘या’ खास कारणामुळे ‘छपाक’मधील लक्ष्मीच्या रोलसाठी दीपिकाचीच निवड !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्व्हाईवर लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर तयार होत असलेल्या सिनेमात दीपिका पादुकोण लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे. या सिनेमात दीपिकाचा चेहरा हुबेहूब लक्ष्मीसारखा केला आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, अ‍ॅसिड अ‍ॅटॅकपूर्वी लक्ष्मीचा चेहरा दीपिकाच्या चेहऱ्याशी जुळत होता.

सिनेमाच्या डायरेक्टर मेघना गुलजार यांनी स्वत: याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, छपाकसाठी त्यांच्या डोक्यात नेहमीच दीपिकाचा चेहरा असायचा. त्यांनी अ‍ॅसिड हल्ल्यापूर्वी लक्ष्मीचे फोटो पाहिले तेव्हा त्यांना लक्ष्मी आणि दीपिकाच्या चेहऱ्यात साम्य आहे असे वाटले. दोघींचा चेहरा बऱ्याच प्रमाणात मिळता जुळता आहे असे त्यांनी नोटीस केले. सिनेमातही दीपिकाचे मेकअप ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर दीपिका बहुतांशी लक्ष्मीसारखीच दिसत आहे.

मेघना यांनी लक्ष्मीच्या रोलसाठी दीपिकाला निवडण्यामागचे कारण सांगितले आहे. त्या म्हणतात की, छपाकसाठी दिपिका नेहमीच माझी परफेक्ट चॉईस राहिली आहे. त्यांनी लक्ष्मीचे आधीचे फोटो पाहिल्यानंतर त्यांना दोघींच्या चेहऱ्यात साम्य वाटले. परंतु त्यांना असे वाटले की, त्यांच्या तशा विचार करण्यामुळे त्यांना असं वाटत आहे. याशिवाय दीपिका हा रोल करेल की नाही याचीही त्यांना शंका होती.

जेव्हा दीपिकाने या रोलसाठी होकार दिला तेव्हा मेघना सरप्राईज्ड झाल्या होत्या. पद्मावत, तमाशा, बाजीराव मस्तानी या सिनेमांनंतर दीपिकालाही लाईट प्रोजक्ट करण्याची इच्छा होती. मेघना म्हणतात की, “आपल्या त्वचेतून बाहेर पडत इतर कोणाच्या त्वचेत स्वत:ला पूर्णपणे बदलणं या प्रकारच्या ग्राऊंडिंगसाठी खूप वेळ लागतो. दीपिका सर्व जीव ओतून यासाठी काम करत आहे. यासाठी खूप धैर्यही लागतं.

तुम्हाला सांगू इच्छितो की, काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची शुटींग संपली आहे. मेघना यांनी सिनेमाच्या सेटवरून दीपिका आणि विक्रांत मेसी यांचे काही फोटो शेअर केले होते. सिनेमात दीपिकाने सलवार सूट आणि हातावर मेहंदी काढल्याचे दिसतह होते. पुढील वर्षी १० जानेवारी रोजी हा सिनेमा थिएटर मध्ये रिलीज होणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त

पावसाळ्यात आरोग्याची घ्या अशी काळजी

सावधान ! चायनीज फूड खाताय ? हे लक्षात असू द्या

‘यकृत’ निरोगी राहण्यासाठी महत्वाच्या टिप्स

You might also like