ग्लॅमरस अंदाजात ‘बोल्ड’ फोटोशूट करताना दिसली सारा अली खान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. कधी तिच्या वैयक्तिक जीवनाला घेऊन तर कधी चित्रपटासाठी चर्चेत असते. नुकतीच सारा तिच्या बोल्ड फोटोसाठी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. तिने नुकतेच हार्पर मॅगजीनसाठी फोटोशूट केले आहे. या मॅगजीनच्या कव्हरपेजवर सारा अलीचा फोटो दिसत आहे. या फोटोत तिचा वेगळा लुक चाहत्यांच्या समोर आला आहे.

या फोटोशूटचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. सारा अली खानच्या चाहत्यांना तिचे फोटो खूप पसंत पडले आहे. या फोटोत साराने फ्लोरल प्रिंट व्हाइट ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये तिचा घायाळ करणारा लुक चाहत्यांना खूप आवडला आहे.

सारा अली खानने काही मिनिटांपुर्वीच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहे. या फोटोला २ लाखापेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहे. त्याचबरोबर तिच्या फोटोंना कमेंटचा वर्षाव होत आहे. सारा अली खानची सोशल मिडियावर चाहत्यांची लिस्ट मोठी आहे. इन्स्टाग्रामवर तिचे १०.१ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सध्या सारा कार्तिक आर्यनसोबत ‘लव आज कल २’ चित्रपटाची शुटिंग करत आहे.