‘फूड पॉयझनिंग’चा त्रास टाळण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्यात पदार्थांमध्ये बॅक्टेरियांची वाढ जलदगीतने होत असल्याने हॉटेलचे पदार्थ खाणे टाळावे. तसेच घरातही शिळे पदार्थ खावू नयेत. विशेषता फ्रिजमध्ये ठेवलेले शिळे पदार्थ जास्त हानीकारक असतात. ही दक्षता न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. उन्हाळ्यात खाद्य पदार्थ लवकर खराब होत असल्याने फूड पॉइझनिंग होऊ शकते. यासाठी काही रामबाण घरगुती उपाय असून ते केल्याने लवकर आराम मिळतो.

लिंबामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटिबॅक्टेरियल आणि अँटिव्हायरल गुण आहेत. यामुळे लिंबू- पाणी प्यायल्याने पोटातील बॅक्टेरिया मरतात. अनशापोटी लिंबू-पाणी घ्यावे. गरम पाण्यात लिंबू पिळून ते पाणी प्यायल्यास लवकर गुण येतो. यासाठी शुद्ध आणि स्वच्छ पाणी वापरावे. दह्यात सुद्धा अँटिबायोटिक गुणधर्म आहेत. यामध्ये थोडे काळे मीठ घालून त्याचे सेवन केल्यास आराम मिळेल. यामुळे फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता कमी असते. तसेच लसणामध्ये अँटी फंगल गुण असल्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या १-२ पाकळ्या पाण्यासह घेतल्याने आराम पडतो.

तुळशीत आढळणारे अँटिमिकोबियल गुणधर्म सूक्ष्मजीवांचा सामना करतात. तुळस अनेक प्रकारे आहारात समाविष्ट करता येईल. एक वाटी दह्यात तुळशीचे पान, काळी मिरी आणि मीठ घालून सेवन करू शकता किंवा चहात तुळशीचे पान टाकून सेवन करू शकता. अशा प्रकारे घरगुती उपाय करून फूड पॉयझनिंगचा त्रास सहज टाळता येऊ शकतो. शिवाय, हे उपाय करण्यासाठी लागणारे पदार्थ घरातच उपलब्ध असतात.

आरोग्य विषयक वृत्त –

शुक्राणू वाढविण्यासाठी ‘ही’ आसने आहेत लाभदायक

गरोदरपणातील काही अविश्वसनीय गोष्टी, ज्या सत्य आहेत 

बहुगुणी पालकाची भाजी खा ; आरोग्य राखा

हवेच्या प्रदुषणामुळे ही होतो अनियमित मासिक पाळीचा त्रास

Loading...
You might also like