३० दिवसांत कमी होईल वजन, करा ‘हा’ घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे वजन वाढणे ही समस्या अलिकडे खूपच वाढली आहे. लठ्ठपणामुळे विविध आजारांना शरीर बळी पडते. त्यामुळे लठ्ठपणा टाळणे आणि आजारांना दूर ठेवणे कधीही चांगले. वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यापैकी लिंबू-पाण्याचा उपाय अनेकजण करतात. हा उपाय चांगला असला तरी तो जास्त प्रभावी होण्यासाठी त्यामध्ये मध आणि दोन चिमूट दालचिनी पावडर मिसळल्यास हा उपाय आणखी प्रभावी होऊ शकतो.

दालचिनीमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे भूक कमी लागते. यामुळे रक्तातील साखरही नियंत्रित होते. दालचिनी घेतल्याचा परिणाम चयापचय क्रियेवर होतो. यामुळे अतिरिक्त चरबी निघून जाते आणि वजन कमी होते.

दालचिनी पावडर, लिंबू-पाणी आणि मधाचा उपाय करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळा. यामध्ये अर्धा चमचा मध आणि दोन चिमूट दालचिनी पावडर मिसळून प्यावे. हे पाणी रोज सकाळी उपाशीपोटी प्यावे. ३० दिवस नियमित हे पाणी प्यायल्याने वजन कमी होते. या ड्रिंकमध्ये दालचिनीचे प्रमाण वाढवू नका. जास्त वापरल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी हा उपाय करत असताना गोड खाणे टाळावे. पश्चिमोत्तानासन आणि नौकासन रोज सकाळी दहा मिनिटे करावे. यामुळे लवकर परिणाम दिसून येतो.

लिंबू-पाण्यात सायट्रिक अ‍ॅसिड असते.यामुळे चयापचय क्रिया वाढते. दालचिनीमधील सेनेमेल्डिहाइडने अतिरिक्त चरबी जलद कमी होते. ब्लॅक टीमध्ये दालचिनी टाकून प्यावे. यामध्ये साखरेऐवजी मधाचा वापर केल्याने वजन लवकर कमी होते. तसेच दुधी भोपळ्याच्या ज्यूसमध्ये दालचिनी पावडरचे काही थेंब मिसळून प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. अद्रकच्या चहामध्ये दालचिनी पावडर मिसळून प्यायल्याने शरीरातील विषरी घटक दूर होतात. यामुळे लठ्ठपणा कमी होतो. आणखी एक उपाय म्हणजे पाणी गरम करून त्यामध्ये दालचिनी मिसळावी. हे गाळून प्यायल्याने वजन कमी होते.