जळगावमधील बीएचआर पतसंस्था अवसायकावर पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेचा (EoW) छापा

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव (Jalgaon) येथील मल्टी-स्टेट असलेल्या बी.एच.आर. (भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था) अवसायक जितेंद्र कंडारे ( Jitendra Kandare) यांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानी आज पुणे ( Pune) येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून छापा ( Raid) टाकून चौकशी करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील बी. एच. आर. पतसंस्था ( b.h.r organisations) घोटाळा ( Scam) प्रकरणी सर्व संचालक सध्या कारागृहात आहेत. पण अजूनही ठेवीदारांच्या ठेवी मिळालेल्या नसून त्यांचा प्रश्न जटील झालेला आहे. मात्र, ठेवीदारांच्या पावत्यांमध्ये २० ते ४० टक्के रक्कम देऊन शंभर टक्के पैसे दिल्याचे सांगितले जात आहे. या पावत्यांच्या गैरव्यवहारप्रकरणी शासनाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे आज पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शहरात विविध ठिकाणी धाड टाकण्यात येत आहे.

बँकेच्या अवसायकावर धाड

बी. एच. आर. पथसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या शिवाजीनगर येथील घरी सकाळीच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून धाड टाकण्यात आली. त्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच पतसंस्थेच्या इतर शहरातील कार्यालयांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण पोलीस अशा तीन पथकांनी छापे मारी केली आहे. पुणे, पिंपरी आणि ग्रामीणला असे तीन गुन्हे दाखल केले आहेत. आणखी पथके जळगावात असून त्यांची कारवाई सुरू आहे. चौकशी सुरू असून, रात्रीपर्यंत कारवाई पूर्ण होईल असे सांगण्यात आले. पोलीस उपायुक्त (EoW भाग्यश्री नवटाके, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरू आहे.

You might also like